शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

शेवगावात दुष्काळासाठी ठिय्या : राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:17 IST

शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करून जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांना चालना देण्याच्या मागणीसाठी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेवगाव तहसीलच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शेवगाव : शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करून जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांना चालना देण्याच्या मागणीसाठी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेवगाव तहसीलच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.शेवगाव तालुक्यात पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. अत्यल्प पावसावर शेतक-यांनी घेतलेल्या कपाशीवर यंदा बोंड येण्यापूर्वीच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पेरणी केलेली कपाशी जळून व करपून चालली आहे. गेल्यावर्षीच्या बोंडअळीच्या अनुदानापासून अनेक गावे वंचित आहेत. अनेक गावात पिण्याचे पाणी, पाटपाणी, वीज, रस्ता आदी मूलभूत समस्या तीव्र बनल्या आहेत. त्यामुळे शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करून जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांना चालना मिळावी. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास प्रसंगी तहसील कार्यालयाचे कामकाज बंद पाडण्यात येईल, असा इशारा सभापती डॉ. घुले यांनी यावेळी दिला.प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व उपस्थित शेतकºयांनी प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच शेतक-यांच्या समस्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. अपु-या पावसावर शेतक-यांनी कपाशी बाजरी तूर, मूग, उडीद पिकांची पेरणी केली. मात्र पावसाअभावी ही पिके करपून व जळून चालली आहेत. प्रशासनाने खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची तसेच बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम तातडीने वाटप करावी, तालुक्याच्या पूर्व भागातील राक्षी, मुरमी,बाडगव्हाण, गोळेगाव, नागलवाडी आदी अनेक गावात पाणी टंचाई उग्र बनल्याने या गावांमध्ये तातडीने टमकर सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, रामनाथ राजपुरे, तालुकाध्यक्ष कैलास नेमाने,ताहेर पटेल, कृष्णा ढोरकुले, संतोष जाधव,जि.प.सदस्य राम साळवे, विजय पोटफोडे,विकास फलके, शिवाजी घुले, माधव काटे, वहाब शेख, कृष्णा पायघन, बबनराव भुसारी आदींनी प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी दिला. प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.शेवगाव पाथर्डी तालुक्यातील मुळा पाटपाणी कार्यक्षेत्रात टेल टू हेड पद्धतीने आवर्तन सोडून संपूर्ण क्षेत्र भिजल्याशिवाय पाटपाण्याचे आवर्तन बंद करू नये. मागील आवर्तनाचे पाणी कमांड क्षेत्रात मिळाले नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजीची भावना आहे. परिसराला वरदान ठरणारे आमच्या हक्काचे पाणी मिळावे, याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्र्रशेखर घुले यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशीकडे भ्रमणध्वनीद्वारे केली. याबाबत दुजाभाव दिसून आल्यास लाभार्थी शेतक-यांचे आंदोलन उभारण्यात येईल. -डॉ.क्षितिजघुले, सभापती, पंचायतसमिती, शेवगाव.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव