शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कारचालकानेच मित्रांच्या मदतीने कुरकुटवाडी येथील महिलेला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:21 IST

बोटा येथे जाण्यासाठी निघालेल्या कुरकुटवाडी येथील महिलेला अज्ञात कारचालकांनी नाशिक-पुणे महामार्गाववर संतवाडी फाटा येथे लुटल्याची घटना रविवारी घडली.

बोटा : बोटा येथे जाण्यासाठी निघालेल्या कुरकुटवाडी येथील महिलेला अज्ञात कारचालकांनी नाशिक-पुणे महामार्गाववर संतवाडी फाटा येथे लुटल्याची घटना रविवारी घडली.कुरकुटवाडी (ता. संगमनेर) येथील लीला भाऊसाहेब कुरकुटे (वय ४५) यांची मुलगी आळेफाटा येथे रुग्णालयात उपचार घेत आहे. लीलाबाई मुलीला भेटून आळेफाटा येथून रविवारी सकाळी बोटा येथे जाण्यासाठी आळेफाटा चौकात थांबल्या होत्या. त्यावेळी तेथे एक कार येऊन थांबली व तुम्हाला बोटा येथे सोडतो, असे लीलाबाई यांना या कारचालकाने सांगितले. त्यावेळी कारमध्ये तिघजण बसलेले होते. दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील संतवाडी फाटा येथे ही कार आली असताना कारचालकाने कार थांबवली. कारमधील तिघांनी लीलाबाई यांना दमदाटी करून शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रूपये दागिने, मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी लीलाबाई यांचे डोळे स्कर्पने बांधले व कार घेऊन तेथून पळ काढला. त्यानंतर लीलाबाई यांनी आळेफाटा पोलीस ठाणे गाठून संबंधीत तीन चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. आळेफाटा पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर