शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी-नगर बसच्या चालक, वाहकास मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 12:47 IST

पाथर्डी : पाथर्डी आगाराच्या नगरहून पांढरीपूलमार्गे पाथर्डीकडे येणाऱ्या बस चालकास जोहारवाडी शिवारात मारहाण करून वाहकाच्या खिशातील तिकिटाची रक्कम ६ ...

पाथर्डी : पाथर्डी आगाराच्या नगरहून पांढरीपूलमार्गे पाथर्डीकडे येणाऱ्या बस चालकास जोहारवाडी शिवारात मारहाण करून वाहकाच्या खिशातील तिकिटाची रक्कम ६ हजार ८४६ रुपये बळजबरीने काढून नेल्याची घटना घडली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शनिवारी दुपारी तीन वाजता पाथर्डी आगाराची बस एम. एच. १४, बी. टी. ११५९ ही मांडवामार्गे नगरला जात असताना साडेचार वाजण्याच्या सुमारास जोहारवाडी येथे रस्त्यातील खड्यात टँकर गेला असल्याने रस्त्यावर लोक जमा झाले होते. त्यामुळे बस थांबली. रस्ता मोकळा झाल्यानंतर बस पुढे जावू लागली असता बसला तीन ते चार चार इसमांनी आडवे येवून चालकास शिवीगाळ केली. परंतु बस चालक पालवे यांनी बस समजूतदारीने पुढे नेली. दुस-या दिवशी रविवारी सकाळी साडे दहा वाजता बसचालक पालवे व वाहक आशा सुभाष बुळे हे पांढरीपूलमार्गे परत पाथर्डीला येत असताना जोहारवाडी शिवारात कौडगाव आठरे येथील आरोपी लक्ष्मण आश्रुजी आठरे, राजेंद्र जग्गनाथ आठरे व इतर दहा ते पंधरा लोकांनी बसला पिकअप (एम. एच. १६, सी. सी. ४२१) आडवी लावून बसचालक रोहिदास ज्ञानदेव पालवे यांना बसचे खाली ओढून कु-हाड, काठ्या, चैन व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वाहक आशा बुळे यांच्याकडील तिकिटाचे जमा झालेले ६ हजार ८४६ रुपये बळजबरीने हिसकावले. बसचालक पालवे यांना झालेल्या मारहाणीत डोक्याला, पाठीला, हात व पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात वाहक आशा बुळे यांनी सरकारी कामात अडथला आणून सरकारी कर्मचा-यास मारहाण करून बळजबरीने रक्कम चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीstate transportएसटी