शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नशिबी अपंगत्व पण सुशिक्षित बेरोजगारांना उभे करण्याचे स्वप्न; दिव्यांग प्रसादची धडपड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 14:24 IST

प्रसाद पंडितने हिम्मत न हारता अक्केरियम (रंगीत मासे पालन) या व्यवसायात करिअर करण्यासाठी एकाकी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत याच व्यवसायातून राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. 

बाळासाहेब काकडे ।  श्रीगोंदा : नगर शहरात शाळकरी विद्यार्थी म्हणून क्रिकेटची अनेक मैदाने गाजविणा-या प्रसाद पंडित याला मस्क्युलर डिस्ट्रिफी या आजाराने कायमचे अपंगत्व आले. अशा परिस्थितीत प्रसाद पंडितने हिम्मत न हारता अक्केरियम (रंगीत मासे पालन) या व्यवसायात करिअर करण्यासाठी एकाकी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत याच व्यवसायातून राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. प्रसाद हा नगर शहरातील प्रसिद्ध डिझायनर किरण पंडित यांचा एकुलता एक मुलगा. अभ्यासात हुशार खेळात पशुपक्ष्यांची विशेष आवड. एक पाऊल पुढे. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले. शिक्षणातून भविष्याची स्वप्न रंगवत असताना प्रसादला डिस्ट्रिफी आजाराने कायमचे अपंगत्व आले. प्रसादवर लाखो रुपये खर्च करून उपचार करण्यात आले. त्यामुळे पंडित परिवार कमालीचा अडचणीत आला. अशा परिस्थितीत प्रसादने रंगीत माशाच्या जाती बीजकरण व रंगीत माशाचा आहार पाणी यांचा इंटरनेटद्वारे अभ्यास केला. शासकीय प्रशिक्षण घेतले. घरातच ब्लुस्टार नावाने घरगुती फिश शॉपचा व्यवसाय सुरु केला. मित्राच्या मदतीने हे रंगीत माशाचे टँक व मासे नगर शहरात ग्राहकांना देण्यासाठी धडपड केली. त्यासाठी अर्शन पठाण, अरुण अब्राहम, अनुराग घिरमिटे या मित्रांनी मदत करण्याची भावना दाखविली आहे.

डिस्ट्रिफी आजाराने माझ्यावर कायमचे अपंगत्व आले. आई, वडिलांनी या आजारातून मुक्तता होण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याने उपयोग झाला. माझे जीवन फक्त घर आणि घरी येणारे मित्र. अशा परिस्थितीत रंगीत मासे पालन व्यवसायाचा अभ्यास केला. या व्यवसायात चांगले दिवस आहेत. मला नगर शहरात एक पेटशॉप सुरु करण्यासाठी वित्तीय संस्थेने मदत केली तर वेळेवर कर्जाची परतफेड करून राज्यात आॅनलाईन सिस्टिमने अनेक पेटशॉप उभे  करण्याचा मानस आहे. यातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे ध्येय आहे, असे प्रसाद पंडित यांनी सांगितले.कर्जाची फाईल प्रलंबितस्वत:चे शॉप नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. प्रसादला रंगीत मासे पालन व्यवसायात आशेचे किरण दिसतात. पण मागे कुणाचे पाठबळ नाही. घरची परिस्थिती अडचणीची झाली आहे. अपंग महामंडळाने कर्जाची फाईल पेंडीग ठेवली आहे ही चिंतेची बाब आहे. पण मदतीचे हात पुढे आले तर या व्यवसायातून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे प्रसादने नियोजन केले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरfishermanमच्छीमार