शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘रोजगार हमी’वर मजुरांची संख्या दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या २ हजार ४४७ कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत ११ हजार २२३ ...

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या २ हजार ४४७ कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत ११ हजार २२३ मजूर कामावर आहेत. ग्रामपंतायतीकडून सध्या १ हजार ७८३ इतकी कामे सुरू असून, त्या अंतर्गत ६ हजार ८३८ मजूर काम करीत आहेत. इतर यंत्रणेमार्फत ६६४ इतकी कामे सुरू असून, ४ हजार ३८५ इतके मजूर कामावर आहेत. संगमनेर तालुक्यात सध्या सर्वाधिक ३८७ कामांवर १ हजार ५९२ इतके मजूर कामावर आहेत. दक्षिण भागात जामखेड तालुक्यात २५८ कामांवर सर्वाधिक १ हजार २१९ मजूर कामावर आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) उदय किसवे यांनी दिली.

---------

तालुकानिहाय कामे व मजुरांची संख्या

तालुका कामांची संख्या मजुरांची संख्या

अकोले १७५ ६३४

जामखेड २५८ १२१९

कर्जत २४१ १६४०

कोपरगाव १५२ ३६०

नगर २०८ ७८८

नेवासा १४८ ६५९

पारनेर १४० ८६९

पाथर्डी १०८ ५०५

राहाता १०८ ४५७

राहुरी १२४ ३५९

संगमनेर ३८७ १५९२

शेवगाव १८० ११३०

श्रीगोंदा १४३ ६१३

श्रीरामपूर ७५ ३९८

एकूण २४४७ ११२२३

-------------------------

आणखी मजुरांची प्रतीक्षा

जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत रोजगार हमी योजनेवरील मजुरांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असली तरी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेची काम देण्याची क्षमता ५९ लाख मजुरांपर्यंत आहे. असे असले तरी सध्या २३ हजार २१० इतकी कामे शिल्लक असून, त्या कामांसाठी प्रशासनाला मजुरांची प्रतीक्षा आहे.

------------------

वैयक्तिक लाभाच्या योजनांवर भर

जिल्ह्यात अडीच हजार कामे सुरू असल्याचे दिसत असले तरी बहुतांश कामे ही वैयक्तिक आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेत वैयक्तिक लाभावर शेतकऱ्यांचा भर आहे. फळबाग लागवड, सिंचन विहिरी, विहिरींची दुरुस्ती, मत्स्यतळे, वनस्पती लागवड, शेततळे, शौचखड्डे, वैयक्तिक शौचालये अशा कामांची संख्या मोठी आहे, अशी माहिती यंत्रणेने दिली.