शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षानंतर उघडले पोलीस चौकीचे दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:14 IST

मांडवगण येथील पोलीस चौकी गेल्या दहा वषार्पासून बंद होती. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात आली. 

श्रीगोंदा  : तालुक्यातील मांडवगण येथील पोलीस चौकी गेल्या दहा वषार्पासून बंद होती. सामाजिक कार्यकर्ते निलेश बोरुडे यांनी गेल्या आठवड्यात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी तातडीने पोलीस चौकी सुरू करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात आली. मांडवगण हे श्रीगोंदा शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. शहराच्या जवळून नगर-सोलापूर राज्य मार्ग गेला आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहे. पोलीस स्टेशनच्या किरकोळ कामासाठी श्रीगोंद्याला जावे लागत होते. मांडवगण परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी प्रयत्न केले. १९९३ मध्ये मांडवगणला पोलीस चौकी सुरू झाली? पण दहा, बारा वर्षात ही चौकी बंद झाली होती.  बंद असलेली पोलीस चौकी सुरू करुण्यासाठी निलेश बोरूडे त्यांच्या सहकाºयांनी पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. तातडीने या ठिकाणी एक सहाय्यक फौजदार, दोन कॉस्टेबलची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच सुरेश लांडगे, पाटबंधारे विभागाचे माजी अभियंता झुंबरराव बोरुडे, पूनम वाघमारे, अमोल रायकर, शिवाजी शेलार, मोहन पवार, विजय बोरुडे, राजेंद्र लोखंडे, सुभाष शिंदे, तुळशीराम रायकर, सिद्धेश्वर शेळके, सचिन शेळके, निलेश विधाते, लखन लोखंडे, राजेंद्र रायकर, तुळशीराम बोरुडे उपस्थित होते.

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाPolice Stationपोलीस ठाणे