शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने वाचविले साडेतीन हजार लोकांचे जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 16:34 IST

तंत्रज्ञानाचा वापर करीत संगमनेरातील तुषार ओहरा हा तरुण ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ समूहाच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचविण्याचे काम करीत आहे.

ठळक मुद्दे तुषार ओहरा यांची जनजागृतीग्रुपवर दोन हजार तरुण रक्तदात्याची यादीमुलींसह महिलांचाही मोठा सहभाग

शेखर पानसरेसंगमनेर (जि. अहमदनगर) : तंत्रज्ञानाचा वापर करीत संगमनेरातील तुषार ओहरा हा तरुण ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ समूहाच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचविण्याचे काम करीत आहे. त्याने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वच रक्तगटांचे समूह स्थापन केले आहेत. यात संगमनेर बरोरबरच मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर यांसह अनेक शहरांतील सुमारे दोन हजारांहून अधिक रक्तदाते जोडले गेले आहेत. हा समूह रक्ताची गरज असणाऱ्यांसाठी वरदान ठरला असून, प्रत्येक प्रकारच्या रक्तगटाचे रक्त रुग्णास सहज आणि त्वरित उपलब्ध होत असल्याचे आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक जणांचे जीव वाचले आहेत.३१ जुलै २०१५ रोजी तुषार ओहरा याने व्हॉट्सअ‍ॅपवर तीन समूह तयार करीत त्याला ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ असे नाव दिले. यात संगमनेरातील दोन तर बाहेरगावातील युवकांचा एक असे समूह तयार केले. या माध्यमातून तीनशे रक्तदाते जोडले गेले होते. जिथे कुणाला रक्ताची गरज भासल्यास हे रक्तदाते समूहावर संदेश पडताच लगेचच रक्तदानासाठी हजर होत. मात्र, दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत गेल्याने रक्तदात्यांची संख्या कमी पडू लागली. यानंतर तुषारने राज्यभरातील रक्तदात्यांशी चर्चा करीत प्रत्येक रक्तगटानुसार वेगवेगळे समूह स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व प्रकारच्या रक्तगटांच्या रक्तदात्यांची माहिती संकलित करण्याचे काम त्याने मित्र व सामाजिक काम करणाºयांच्या मदतीने केले. काही दिवसांचा अवधी गेल्यानंतर रक्तगटाच्या प्रकारानुसार ए+, ए-, बी+, बी-, एबी+, एबी-, ओ+, ओ- असे एकूण सोळा समूह तयार करण्यात आले. प्रत्येक प्रकारच्या रक्तगट असलेल्या समूहात तरुणांसह डॉक्टर, शिक्षक, वकील, चाकरमाने, सरकारी व खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, माध्यम समूहातील मित्रांचा सहभाग आहे.रक्तदानासाठी महिलांचाही पुढाकार‘रक्तदान श्रेष्ठ दान’ या समूहात पुरुषांबरोबरच संगमनेरातील महिलांचाही एक समूह सक्रिय आहे. यात प्रत्येक प्रकारच्या रक्तगटाच्या सुमारे शंभर मुली व महिला रक्तदात्या एकत्रित जोडल्या गेल्या आहेत. रुग्णास रक्ताची गरज भासल्यास या रक्तदात्या कुठलीही वेळ व काळ न बघता तत्काळ रक्तदानासाठी हजर होतात. यात स्वप्नाली तापडे, कीर्ती साबळे, पूनम लोहे यांसह अनेक मुली व महिलांचा पुढाकार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर