अहमदनगर : आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियेची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रातील अधिसूचनेविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने मंगळवारी आंदोलन सुरू करण्यात आले असून, सरकारच्या या निर्णयाचा डॉक्टरांकडून निषेध करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने आयुर्वेद शाखेतील विद्यार्थ्यांना विविध ५८ अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. तशी आधीसूचना शासनाने जारी केली आहे. सरकारच्या याविरोधातच ११ डिसेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने निषेध करण्यात आला. आंदोलनात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिन वहाडणे, बाळासाहेब देवकर, प्रताप पटारे, महेश वीर, रामदास बांगर, निसार सय्यद, सुप्रिया वीर, भोसले, दिलीप फाळके, दीपाली फाळके, दीपाली पठारे, अशोक नरवडे, सुजाता नरवडे, निसार शेख, पांडुरंग दौले, सुभाष तुवर, नरेंद्र वानखेडे, वानखेडे, दिलीप बगल, संतोष चेडे, अमित करडे, गणेश बंड, रेश्मा चेडे, संदीप सुराणा, हेमा सुराणा, सोनाली वहाडणे, अर्जुन शिरसाठ आदींसह डॉक्टर्स उपस्थित होते. सरकारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशानने आंदोलनाची रूपरेषा ठरविली आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी देशातील सर्व दवाखाने, क्लिनिक व ओपीडीच्या सेवा सकाळी ६ ते सायं. ६ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्यापर्यंत पोहोचवा, हा या मागील उद्देश आहे. आंदोलनामध्ये शासकीय व खाजगी महाविद्यालयातील पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थीदेखील सक्रिय सहभाग घेणार आहेत. या आंदोलनामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्व स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिटी शाखा, शासकीय डॉक्टरांच्या संघटना, मेडिकल कॉलेजमधील शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत.
..
सूचना फोटो आहे.