शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जवळा येथे सोन्याच्या आमिषाने डॉक्टरचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 20:48 IST

स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरांना तीन अज्ञात चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. चोरटे पळून जाताना दोन डॉक्टरांंनी त्यांचा पाठलाग केला.

जामखेड : स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरांना तीन अज्ञात चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. चोरटे पळून जाताना दोन डॉक्टरांंनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी चोरट्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एका डॉक्टराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा डॉक्टर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी जामखेड तालुक्यातील जवळा शिवारात घडली.या हल्ल्यातून वाचलेले डॉ. मनोरंजन जोगेश हालदार यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांचे भाऊ डॉ. श्रीकृष्ण जोगेश हालदार (रा.भंडारवाडी ता. जि. उस्मानाबाद) हे मूळव्याधीचा उपचार करणारे डॉक्टर आहेत. भाऊ व्यवसायानिमित्त वर्धा व अमरावती येथे जातात. तेथे जवळा (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथील दोघा जणांशी त्यांची भेट झाली. जुने सापडलेले सोने तीन लाख रुपयांत ३०० ग्रॅम देण्याचे दोघांनी सांगितले. त्यामुळे श्रीकृष्ण हालदार हे त्यांच्या गावी (भंडारवाडी, ता. जि. उस्मानाबाद) असलेल्या डॉ. मनोरंजन यांनाही माहिती दिली. डॉक्टर असलेल्या दोघा भावंडांनी तीन लाख रुपये घेवून मंगळवारी सकाळी उस्मानाबाद बसस्थानकातून तुळजापूर-नाशिक बसने जामखेड येथे पोहोचले. तेथून ते सांगितल्याप्रमाणे जवळा शिवारातील इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गेले. त्यांच्याकडील फडक्यात गुंडाळून ठेवलेले सोने घेवून त्यांना तीन लाख रुपये दिले. सोने घेतल्यानंतर ते बनावट असल्याचे लक्षात आल्यावर त्या दोघांना विचारणा केली. मात्र त्यांनी लगेच धूम ठोकली. त्यांचा पाठलाग केला, परंतु चोरट्यांनी डॉ. श्रीकृष्ण यांच्या छातीत, पोटात चाकूने वार केले. डॉ. मनोरंजन यांनाही जखमी केले. त्यानंतर दोघेही बेशुद्ध पडले.

जखमीवर उपचार सुरू

मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास जखमी अवस्थेत पडलेल्या दोघांना पाहून एकाने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला. तेथे रूग्णवाहिका गेल्यानंतर डॉक्टरांनी श्रीकृष्ण मयत झाल्याचे पोलिसांना फोन करून सांगितले. दुसरे डॉ. मनोरंजन हालदार हे गंभीर जखमी आहेत. पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनी घटनास्थळी जाऊन जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड