मुलांना सर्दी असेल तर खेळायला पाठवू नका. बाकी मुलांना संसर्ग होणार नाही.
ताप येत असेल तर दुर्लक्ष करू नका. लगेच कोरोना चाचणी करा
मुलांना जवळ घेणे, त्यांना स्पर्श करणे टाळले पाहिजे. त्यांना जंतुसंसर्ग होणार नाही.
मुलांना मास्क वापरायला शिकवा.
मुलांना काहीच होत नाही, हा गैरसमज काढून टाका.
मुलांना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून सतत हात धुवायला लावा.
मुलांना सकस पौष्टिक आहार द्या.
मुलांना उन्हाळा असल्याने जास्त प्रमाणात पाणी पाजा.
मुलांना कोरोनाची अवाजवी भीती घालू नका. त्यांना अधिक मानसिक ताण देऊ नका.
सुट्टीत मुलांना गर्दीमध्ये तसेच गावाला पाठवणे टाळा.
कोरोना एक दिवसापासून कोणत्याही वयाच्या बाळांना होऊ शकतो. तसेच इतरांनासुद्धा जंतुसंसर्ग होऊ शकतो.
नियम पाळू या आणि आपल्या मुलांना कोरोना संसर्गापासून वाचू या.
वेळीच खबरदारी घ्या. लक्षणे आढळल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क करा.
..........................
डॉ. उज्ज्वला शिरसाट-ढाकणे
नवजात शिशू व बालरोगतज्ज्ञ