शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षात कुरडया नकोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 21:46 IST

साईनगरीतील महिलांनी यंदा कुरडया तयार करण्याकडे पाठ फिरवली आहे. यंदा साई शताब्दी वर्षात विकास कामे झाली नसल्यामुळे हा बहिष्कार नव्हे तर केवळ बिनबुडाच्या अफवांमुळे शिर्डीत यंदा कुरडया करण्यात येत नाहीत.

ठळक मुद्देनिव्वळ अफवा व अंधश्रद्धा असल्याचा पुरोहितांचा निर्वाळा

शिर्डी : साईनगरीतील महिलांनी यंदा कुरडया तयार करण्याकडे पाठ फिरवली आहे. यंदा साई शताब्दी वर्षात विकास कामे झाली नसल्यामुळे हा बहिष्कार नव्हे तर केवळ बिनबुडाच्या अफवांमुळे शिर्डीत यंदा कुरडया करण्यात येत नाहीत.महाराष्ट्रात सणासुदीला किंवा आंनदाच्या क्षणी जेवणात कुरडई नाही असे क्वचीतच होते. उन्हाळ्यात भल्या पहाटे प्रत्येक गल्लीत एकमेकींच्या मदतीने कुरडया तयार करण्याची लगबग बघायला मिळते. शिर्डीत मात्र यंदा अक्षरश: सामसुम आहे. साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष असल्याने कुरडया करणे अशुभ असल्याची अफवा पसरल्याने हा चमत्कार घडला आहे. काहीजण विकत घेतील किंवा काहीजण नातलगांकडुन आणतील पण या अंधश्रद्धेतुन बाहेर पडले नाही तर अनेक गोरगरीबांना यंदा कुरडई शिवाय सण साजरे करावे लागणार आहेत.एखाद्या घरात दुख:द घटना घडली तर त्या वर्षी कुरडया तयार करत नाहीत. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत पुण्यस्मरण म्हटले जाते तर संताच्या निर्वाण दिनाला पुण्यतिथी म्हटले जाते, त्यांच्या निर्वाणाने तो दिवस सुद्धा पावन होतो. सार्इंच्या समाधीला यंदा शंभर वर्षे होत आहेत. साई समाधी शताब्दीच्या रूपाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी व एकदाच येणारी दिवाळी आपण साजरी करत आहोत.

पुरोहित बाळासाहेब जोशी याबाबत म्हणाले, कुरडया वेटोळ्याच्या असतात म्हणुन चालत नाही असे म्हणणारांना जिलेबी, शेव चालते. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत त्याचा व शताब्दीचा काहीही संबध नाही. या अफवांवर कोणीही विश्वास ठेवु नये व बिनधास्त कुरडया बनवाव्यात. पुरोहित अनंतशास्त्री लावर म्हणाले, समाधी शताब्दी वर्षात कुरडया करायच्या नाही याला कोणताही शास्त्राधार नाही, ही निव्वळ कुणीतरी खोडसाळपणे पसरवलेली अफवा आहे, गजानन महाराजांच्या समाधी शताब्दीतही शेगावला अस काही झाले नाही, घरात दुख:द घटना घडली तरच कुरडया करत नाहीत़ यंदा समाधी शताब्दीचे पावन वर्ष आहे, तेव्हा कुरडया करायला काहीच हरकत नाही.वैभवशास्त्री म्हणाले, या वर्षी कुरडया करू नये अशी अफवा पसरली आहे पण तीला कोणताही शास्त्राधार नाही आणि व्यवहारीकदृष्ट्या ही गोष्ट संयुक्तीक नाही. या उलट बाबांसाठी या वर्षी जास्त कुरडया बनवुन भक्तांमध्ये वितरीत कराव्या असे मला वाटते. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरsaibabaसाईबाबा