........................................
चांदेकसारेत पोलिओ लसीकरण
चांंदेकसारे : पोहेगाव केंद्रांतर्गत चांंदेकसारे उपकेंद्र येथे पल्स पोलिओ अभियान यशस्वी झाले. सकाळी अभियानाला सुरुवात झाली. एकूण १५१ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये पोलिओ बुथ टाकण्यात आले. लसीकरण यशस्वी करण्यासाठी सुपरवायझर शरद मोरे, अलका भुतंबरे, सोनी खरात, सुधा तुवर, सीमा पवार, अरुणा गाताडे यांनी परीश्रम घेतले.
....................................
तळेगाव ते चिंचोलीगुरव रस्त्यासाठी ९० लाख निधी मंजूर
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ते चिंचोलीगुरव रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण कामासाठी ९० लाख २३ हजार ९९१ रुपये निधी मंजूर झाला असून, या कामाची निविदा काढण्यात आल्याची माहिती छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांनी दिली. तळेगाव दिघे ते चिंचोलीगुरव या दुर्दशाप्राप्त डांबरी रस्ता व मजबुतीकरण कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ९० लाख २३ हजार ९९१ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत होती. तळेगाव दिघे गावानजीकचा पूल ते समर्थ पेट्रोल पंपादरम्यानच्या दुर्दशाप्राप्त डांबरी रस्ता कामासाठी ८६ लाख रुपये निधी मंजूर झाल्याचेही जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी सांगितले.