शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र शिक्षकांच्या यादीचा गोंधळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 11:56 IST

जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज बुधवारी संपत आहे़ मात्र बदलीपात्र शिक्षकांच्या याद्यांचा गोंधळ अद्याप सुरूच असून, आता जिल्हास्तरावर याद्या प्रसिद्ध करण्याचा आदेश शिक्षण विभागाला मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया सुरू होऊनही याद्यांचा गोंधळ सुरूच असल्याने शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे.

ठळक मुद्देजिल्हांतर्गत बदलीप्रक्रियाजिल्हास्तरावर सायंकाळी यादी प्रसिद्धअर्ज दाखलसाठी आज अखेरचा दिवस

अहमदनगर - जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज बुधवारी संपत आहे़ मात्र बदलीपात्र शिक्षकांच्या याद्यांचा गोंधळ अद्याप सुरूच असून, आता जिल्हास्तरावर याद्या प्रसिद्ध करण्याचा आदेश शिक्षण विभागाला मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया सुरू होऊनही याद्यांचा गोंधळ सुरूच असल्याने शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे.

जिल्हांतर्गत बदलीप्रक्रिया सुरू झाली आहे़ शिक्षण विभागाच्या पोर्टलवर आॅनलाइन अर्ज दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस आहे. बदलीप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बदलीपात्र शिक्षक आणि त्यांच्या शाळांची यादी प्रसिद्ध करणे बंधनकारक असते़ कारण ज्या शाळेतील शिक्षक बदली पात्र आहे, अशा शाळेची निवड अर्ज दाखल करताना करावी लागते़ जिल्ह्यातील ७ हजार ३४३ शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत़ या शिक्षकांच्या याद्या शिक्षण विभागाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच त्या तालुक्याला पाठविण्यात आल्या आहेत. त्यावर हरकतीही मागविण्यात आल्या असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे. परंतु उपलब्ध झाल्या नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे. त्यामुळे त्यांना शाळा निवडणे कठीण होऊन बसले आहे. जिल्ह्यात आॅनलाइन याद्यांचा गोंधळ सुरू असतानाच आता जिल्हास्तरावरही याद्या प्रसिद्ध करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली आहे.गतवर्षी जिल्हांतर्गत बदलीला उशीर झाला होता़ त्यामुळे चालूवर्षी शिक्षण विभागाने बदलीप्रक्रिया वेळेत सुरू केली. बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यातील सुमारे ११ हजार शिक्षक आहेत. त्यापैकी ७ हजार शिक्षक बदलीस पात्र आहेत. त्यामुळे चालूवर्षी सर्वाधिक बदल्या होणार आहेत. सर्वप्रथम सवर्ग एकमधील शिक्षकांना प्राधान्य आहे. त्यांची अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या बुधवारी संपणार आहे. मात्र बदलीपात्र शिक्षकांच्या यादीच्या गोंधळामुळे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. जिल्हास्तरावरील शिक्षकांना जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात पाहायला मिळणार आहे़ त्यानुसार त्यांना शाळांची निवड करता येणार आहे.

बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्या आहेत़ त्याचबबरोबर तालुक्याच्या ठिकाणही प्रसिद्ध झाल्या असून, नव्याने जिल्हास्तरावर यादी प्रसिद्ध करण्याचा आदेश प्राप्त झालेला आहे.  -रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदबदलीपात्र शिक्षक असेअकोले-५४२जामखेड-२७५कर्जत-४३९कोपरगाव- ३८४नगर शहर-६३नगर तालुका-५९२नेवासा-६७४पारनेर-६८२पाथर्डी-५३०राहाता-४०९राहुरी-४८८संगमनेर-८२०शेवगाव-३५३श्रीगोंदा-७६४श्रीरामपूर-३२९

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद