शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

१४ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार : आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 11:29 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील उपाध्यापक, पदवीधर १४ शिक्षकांना मंगळवारी जाहीर झाला.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील उपाध्यापक, पदवीधर १४ शिक्षकांना मंगळवारी जाहीर झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते आज पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्कराचे स्वरुप आहे.जिल्हा शिक्षक पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी वरील पुरस्कराची घोषणा केली. यंदाच्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड करण्यात आली असून, याशिवाय एका केंद्र प्रमुखाचाही पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेने आॅनलाईन अर्ज मागविले होते. तालुक्यातून प्राप्त अर्जांची छाननी गट शिक्षणअधिका-यांमार्फत करण्यात आली. छाननीत पात्र ठरलेल्या शिक्षकांचे तालुकास्तरीय समितीकडून मूल्यमापन करण्यात आले. जिल्ह्यात एकूण १४ तालुके आहेत. तालुकास्तरावर मूल्यमापन केलेल्या शिक्षकांचे अहवाल बंद पाकिटात जिल्हा परिषदेला सादर करण्यात आले.शिक्षकांची २५ गुणांची लेखी परीक्षाशिक्षकांची २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली़ लेखी परिक्षेची उत्तरपत्रिका तपासून यादी जिल्हा निवड समितीसमोर सादर करण्यात आली़ जिल्हा निवड समितीने मूल्यमापनासह लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड केली आहे़ केंद्रप्रमुखांतून एकास पुरस्कार दिला जातो़ या पुरस्करासाठी एकमेव मंगल चंद्रकांत महामुनी यांचा अर्ज प्राप्त झाला होता़ त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़पुरस्कारार्थी शिक्षक तालुकानिहायअकोले- सुनीता प्रभाकर वाल्टे, (उपाध्यापक, पानसरवाडी)संगमनेर- दिगंबर सोमनाथ फटांगरे (उपाध्यापक, धुमाळवाडी)कोपरगाव-सुधाकर दत्तात्रय निकुंभ (उपाध्यापक, डाऊच)राहाता- मिलिंद आनंद खंडीझोड (उपाध्यापक, रामपूरवाडी)श्रीरामपूर-राजू विठ्ठल भालेराव (उपाध्यापक, माळेवाडी)राहुरी- विजय केशव कांडकर (उपाध्यापक, करपरावाडी)नेवासा-बाळकृष्ण मुधकर मुळे (उपाध्यापक, नजिक चिंचोली)शेवगाव-शुभांगी भाऊसाहेब शिलार (उपाध्यापक, शेवगाव)पाथर्डी- शहादेव बाबासाहेब काळे (पदवीधर, अकोले)जामखेड- रत्नमाला सखाराम खुटे (उपाध्यापक, इंदिरानगर)कर्जत- प्रितम दत्तात्रय गुरव (पदवीधर, दुधोडी)श्रीगोंदा- भाऊसाहेब बन्सी दातीर (पदवीधर, शेडगाव)पारनेर- मंगेश वसंत खिलारी (उपाध्यापक, टाकळीढोकेश्वर)नगर- लक्ष्मण रंगनाथ टिमकरे (मुख्याध्यापक, जेऊर)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद