शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांपूर्वी जिल्हा विभाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:56 IST

कोकमठाण येथे रविवारी जंगलीदास महाराज आश्रमात महावितरणच्या अभियंता संघटनेचे ४५ वे वार्षिक अधिवेशनात झाले.

कोपरगाव : अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा असल्याने कामाचा ताण वाढतो. त्यावर जिल्हा विभाजन हा महत्त्वाचा पर्याय असून, त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. येत्या विधानसभा निवडणुकांपुर्वी जिल्हा विभाजनाची घोषणा होऊन नवीन जिल्हे अस्तित्वात येतील, असे सूतोवाच पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. कोकमठाण येथे रविवारी जंगलीदास महाराज आश्रमात महावितरणच्या अभियंता संघटनेचे ४५ वे वार्षिक अधिवेशनात झाले. या अधिवेशनाचे शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार स्नेहलता कोल्हे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, संचालक गणपत मुंडे, सतीश कर्पे, संघटनेचे अध्यक्ष संजय ठाकूर, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विजय राणे, प्रताप शेळके आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपले काम करताना क्षमता सिद्ध करावी. चांगल्या कामात पाठबळ दिल्यास कामे सुलभ होतात, असे सांगून प्रा. शिंदे यांनी शेतकºयांना वेळेत वीज देण्याची सूचना केली. महाराष्ट्रातील सर्व खात्यांना लोकसेवक बिल लागू झाले असेल तर ऊर्जा खात्याच्या महावितरणलाही लोकसेवकाचे बिल लागू झाले पाहिजे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहेत. सोशल मीडियातून वीज विषयक तक्रारी सकारात्मक घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येकाने आपल्या कामात कर्तव्यदक्ष राहावे, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्यभरातील अभियंता व अधिकारी उपस्थित होते.मुख्यालयाचे ठिकाणचा निर्णयअनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. जिल्ह्याच्या विविध खात्यांच्या प्रमुखांना व अधिकºयांना मोठ्या जिल्ह्यात जाणं, सेवा देणं जिकिरीच काम होत. जनभावनेनुसार जिल्ह्याचे विभाजन होऊन दोन जिल्हे झाले पाहिजेत. त्या दृष्टीने राज्यसरकार प्रयत्नशील आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करताना पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर असावे, की संगमनेर या वरून वाद होत होते. मात्र ते वाद तेव्हाच्या सरकारमधील लोकांमध्ये समन्वय नसल्याने होत होते. आता सरकार बदललेले आहे. त्यामुळे हेडक्वॉर्टरच्या संदर्भात योग्य तो निर्णय राज्यसरकार घेईल, असेही राम शिंदे यांनी सांगितले.