शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांबाबत जिल्हाधिकारी मौनात : स्वयंसेवी संस्थांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 13:50 IST

जिल्ह्यातील वाळू तस्करांची मुजोरी ठेचण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र बैठकांमध्ये व्यस्त आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अ‍ॅड. श्याम असावा यांना वाळू तस्करांनी धमकी दिली. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाच्या कार्यकर्त्यांसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना वेळ नव्हता. त्यामुळे संस्थांचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांच्यासह स्वयंसेवी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अहमदनगर : जिल्ह्यातील वाळू तस्करांची मुजोरी ठेचण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र बैठकांमध्ये व्यस्त आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अ‍ॅड. श्याम असावा यांना वाळू तस्करांनी धमकी दिली. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाच्या कार्यकर्त्यांसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना वेळ नव्हता. त्यामुळे संस्थांचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांच्यासह स्वयंसेवी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.नगर जिल्ह्यात बेसुमार वाळूउपसा सुरु असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे वाळूतस्करांचे धाडस वाढले असून एका वाळूतस्कराने मंगळवारी थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अ‍ॅड. शाम आसावा यांना धमकी दिली. ‘लोकमत’ कार्यालयावरही काही वाळूतस्करांनी पाळत ठेवल्याचा प्रकार घडला आहे. ‘लोकमत’ने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.नगर जिल्ह्णात मार्च महिन्यात वाळूचे लिलाव देण्यात आले आहेत. या लिलावाची अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे व जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे यांनी केलेली प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणली आहे. ही गंभीर बाब असतानाही प्रशासनाकडून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.वाळू तस्करांच्या या कृतीविरोधात दाद मागण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थाच्या महासंघाचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. मात्र जिल्हाधिकारी द्विवेदी बैठकांमध्ये व्यस्त आहेत. बैठक झाल्यानंतर भेटण्याचा त्यांनी निरोप धाडला. त्यामुळे विविध स्वयंसेवी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी यांना यापूर्वी अवैध पद्धतीने सुरू असलेल्या तस्करीचे व्हीडिओ पाठवूनही त्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे निवेदन घेवून ते काय कारवाई करणार? असा सवाल अ‍ॅड. असावा यांनी केला. यावेळी स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, विशाल अहिरे,भिरेन गायकवाड, विकास सुतार, संकेत होले, रोहित तनपुरे, अब्दुल खान,प्रणित कोटा, आलिम पठाण, किशोर मुनोत आदी उपस्थित होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन दिले. त्यांनी कारवाई करू, असे दोन ओळीचे तोंडी आश्वासन देवून कार्यकर्त्यांची बोळवण केली.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयanna hazareअण्णा हजारे