शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक भरती प्रकरण : प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची मिळेना माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:50 IST

जिल्हा बँकेच्या प्रशासनाने नोकर भरतीची नियुक्तीपत्रे उमेदवारांना साध्या टपालाने का पाठवली? तसेच प्रतीक्षा यादीतील किती उमेदवारांंना बँकेने नियुक्ती दिली? असे प्रश्न भरतीबाबत उपस्थित झाले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक होत असून यामध्ये या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

अहमदनगर : जिल्हा बँकेच्या प्रशासनाने नोकर भरतीची नियुक्तीपत्रे उमेदवारांना साध्या टपालाने का पाठवली? तसेच प्रतीक्षा यादीतील किती उमेदवारांंना बँकेने नियुक्ती दिली? असे प्रश्न भरतीबाबत उपस्थित झाले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक होत असून यामध्ये या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या नोकरभरतीतील गैरप्रकार ‘लोकमत’ने सर्वप्रथम उघडकीस आणले होते. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर ४६५ जागांच्या या भरतीची चौकशी होऊन भरती रद्द करण्यात आली. कालांतराने न्यायालयीन निर्णयाचा आधार घेत उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली तर ६४ उमेदवारांच्या भरती प्रक्रियेची फेरचौकशी झाली. मात्र, हा फेरचौकशी अहवालही संशयास्पद असल्याची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर भरतीची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश सहकार आयुक्तांनी दिला आहे. यामुळे बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. बँक प्रशासनाने या भरतीची माहिती संचालक मंडळापासून देखील दडवली असल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. उमेदवारांंना बँकेने साध्या टपालाने नियुक्तीपत्रे पाठवली. यातील काही नियुक्तीपत्रे उमेदवारांना मिळालीच नाहीत अशी तक्रार ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे. या पदांवर नंतर कुणाची नियुक्ती करण्यात आली? प्रतीक्षा यादीतील किती उमेदवारांना नियुक्ती मिळाली? त्यात गुणवत्ता यादीतील ज्येष्ठता जपली गेली आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. या भरतीनंतर बँकेत किती उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या व त्यांची गुणवत्ता काय? हा तपशील काही उमेदवारांनी बँकेकडे मागितला होता. मात्र, बँकेकडून तो देण्यात आलेला नाही. लिपिक पदावर हजर झालेल्या काही उमेदवारांचे राजीनामे घेऊन त्यांना ज्युनिअर आॅफिसर पदावर नियुक्ती देण्यात आली, अशीही चर्चा आहे. असे राजीनामे घेतले असतील तर त्यासाठी कोणते धोरण होते, असाही प्रश्न आहे.  मुख्य कार्यकारी अधिका-यांवर कारवाई होणार ? बँकेच्या भरतीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्यानंतरही संचालक मंडळाने काहीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्यावर कारवाई करा असा सहकार विभागाचा आदेश असताना तो मोडीत काढत संचालक मंडळाने त्यांना मुदतवाढ दिली. या मुदतवाढीला कायदेशीर सल्लागारांनी परवानगी दिली नसतानाही संचालक मंडळाने हा निर्णय घेतला. बँकेच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक होत आहे. या बैठकीत वर्पे यांच्यावरील आक्षेपांबाबत चर्चा होणार का? याची प्रतीक्षा आहे. अण्णांच्या पत्रालाही वाटाण्याच्या अक्षता जिल्हा बँकेच्या भरतीबाबत अण्णा हजारे यांनी लेखी स्वरुपात आक्षेप उपस्थित केले होते. मात्र, सहकार विभागाचे अधिकारी दिगंबर हौसारे यांच्या नेतृत्वाखालील फेरचौकशी समितीने हजारे यांच्या मुद्यांकडेही दुर्लक्ष केले आहे. फेरचौकशी अहवालावर हजारे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यांची या भरतीबाबत आता काय भूमिका आहे याची उत्सुकता आहे. नोकरभरतीबाबत संचालक अंधारात ; पानसरे यांचा आक्षेप बँकेच्या नोकरभरतीबाबत ‘लोकमत’ने उपस्थित केलेले प्रश्न योग्य असून या भरतीबाबत संचालक मंडळही अंधारात असल्याची प्रतिक्रिया दत्ता पानसरे यांनी ‘लोकमत’ ला दिली.  ते म्हणाले, मी या भरतीबाबत लेखी तक्रार केलेली आहे. भरतीत गडबडी झालेल्या आहेत. दोन चार संचालकांनीच सर्व निर्णय घेतले आहेत. प्रशासकीय अधिका-यांनीही मनमानी केली आहे. बँकेतील कामे देखील ठराविक एजन्सीजला दिली जातात. एजन्सी नियुक्त करण्याबाबत पारदर्शीपणा नाही. सहकार सभागृहाच्या बांधकामात देखील गडबडी आहेत. मी या प्रश्नांबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत अनेकदा भांडलो. मात्र, या गंभीर बाबी दडपून नेण्याचे काम सुरु आहे, असे पानसरे म्हणाले. केवळ ‘लोकमत’चा पाठपुरावाजिल्हा बँकेच्या भरतीसाठी ‘नायबर’ या संस्थेला काम देण्यात आले तेव्हापासून ‘लोकमत’ने या भरतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मध्यंतरी अनेक संघटना, व्यक्तींनी भरतीबाबत तक्रारी केल्या. मात्र, नंतर याबाबत अनेकांनी मौन बाळगणे पसंत केले आहे. ‘लोकमत’ने मात्र सातत्याने याचा पाठपुरावा सुरु ठेवला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्रjobनोकरी