////////////////////बाबासाहेब भोस////////////////////)))))
जिल्हा बँक निवडणूक : पवारांनी घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी पुण्यात भेट घेतली. जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या संचालकांशी चर्चा करत माहिती घेतली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार अशुतोष काळे, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, ////////////////////बाबासाहेब भोस//////////////////// आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे २१ पैकी १७ संचालक बिनविरोध निवडणूक आले आहेत. चार जागांसाठी येत्या शनिवारी मतदान होत आहे. रयत शिक्षण संस्थेबाबत पुणे येथे बैठक होती. या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष फाळके यांच्यासह जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांनी पवार यांची भेट घेतली व जिल्हा बँकेच्या घडामोडींबाबत माहिती दिली. जिल्हा बँकेच्या राजकीय घडमोडींची पवार यांनी माहिती जाणून घेत फाळके यांच्यासह संचालकांचे कौतुकही केले.
जिल्हा बँकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. संचालक बिनविरोध निवडून आणण्यात पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बँकेचा अध्यक्ष महाविकास आघाडीचाच होईल, असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक संचालक राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बँकेच्या अध्यक्षांचे नाव पवार यांच्याकडूनच सुचविले जाण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित संचालकांनी निवडणुकीनंतर प्रथमच पवार यांची भेट घेतली.
...
मतदारांची पळवापळवी
जिल्हा बँकेच्या नगर, पारनेर आणि कर्जत तालुक्यांतील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात निवडणुका होत आहेत. या चारही जागा ताब्यात घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे; परंतु खासदार डॉ. सुजय विखे हेही त्यांच्या उमेवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदारांची पळवापळवी सुरू असून, नगर तालुक्यात महाविकास आघाडीने विशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे या चारही तालुक्यांत चुरस पाहायला मिळत आहे.