याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेवक स्वप्नील शिंदे, माजी नगरसेविका शारदाताई ढवण, अनिल ढवण, बाळासाहेब बारस्कर, पत्रकार निशांत दातीर, ऋषिकेश ढवण, रोहन ढवण, तुषार पोटे, विशाल नाकाडे, कैलास गर्जे, चंद्रकांत तागड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले, स्व. दिगंबर ढवण यांनी अल्पकाळातच पाइपलाइन रोड, ढवणवस्ती परिसरात लोकोपयोगी कार्य करून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला. उपनगराचा वाढता विस्तार पाहता नागरिकांचे प्रश्न सुटावेत, त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यामुळे या भागात अनेक विकासकामे होऊन या भागाचा कायापालट झाला. कोरोनामुळे आज सर्वांचीच बिकट परिस्थिती झाली आहे. अशा परिस्थिती एकमेकांना प्रत्येकाने आधार देण्याची गरज आहे. सातपुते, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, दीपाली बारस्कर यांनी स्व. ढवण यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्तविक अनिल ढवण यांनी केले. सूत्रसंचालन ऋषिकेश ढवण यांनी केले. आभार रोहन ढवण यांनी मानले.
----------
ओळी-
दिवंगत नगरसेवक दिगंबर ढवण यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी विचार मंचच्या वतीने ढवणवस्ती येथे किराणा वाटप करण्यात आले. याप्रसंगी खा. डॉ. सुजय विखे, दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, नगरसेविका दीपाली बारस्कर, निशांत दातीर आदी.
फोटो -