शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

Ahmednagar: जि. प. बदल्यांत वैद्यकीय मंडळाकडून होणार प्रमाणपत्रांची तपासणी, तोपर्यंत तात्पुरती ॲार्डर

By चंद्रकांत शेळके | Updated: May 9, 2023 17:45 IST

Ahmednagar: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बदल्यांमध्ये सवलत मिळण्यासाठी जी वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली आहेत, त्याची संबंधित कर्मचाऱ्यांनी १५ दिवसांत वैद्यकीय मंडळाकडून पडताळणी करून आणावी. तोपर्यंत बदल्यांची ॲार्डर तात्पुरती राहील, असा पारदर्शी निर्णय जिल्हा परिषद बदल्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी घेतला आहे.

- चंद्रकांत शेळके अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बदल्यांमध्ये सवलत मिळण्यासाठी जी वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली आहेत, त्याची संबंधित कर्मचाऱ्यांनी १५ दिवसांत वैद्यकीय मंडळाकडून पडताळणी करून आणावी. तोपर्यंत बदल्यांची ॲार्डर तात्पुरती राहील, असा पारदर्शी निर्णय जिल्हा परिषद बदल्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी घेतला आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र सादर करणारे कर्मचारी उघडे पडणार आहेत. 

बदल्यांमध्ये अनेक कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून सवलत घेतात. यात अनेक कर्मचाऱ्यांनी दिव्यांग किंवा इतर दुर्धर आजार नसतानाही खोटी प्रमाणपत्र दिल्याचा संशय आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात पहिल्या दिवसापासून पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने यावेळी बदल्यांत काही कठोर निर्णय घेतले आहेत.

जिल्हा परिषदेच्या बदल्यांची प्रक्रिया दि. ९ मे पासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्या होत्या. त्यासाठी जिल्हा परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता बदलीपात्र कर्मचारी जमले. बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सीईओ येरेकर यांनी कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत सूचना केली. जे कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून बदलीमध्ये सवलती घेणार आहेत, त्यांनी हे प्रमाणपत्र पुढील १५ दिवसांत वैद्यकीय मंडळाकडून पडताळणी करून आणावे. तसे पत्र जिल्हा परिषद वैद्यकीय मंडळाला देणार आहे. तोपर्यंत बदल्यांची ॲार्डर तात्पुरती असेल. जर प्रमाणपत्र खोटे आढळले तर संबंधित कर्मचाऱ्याबरोबर प्रमाणपत्र देणाऱ्या यंत्रणेवरही कारवाई होईल. त्यामुळे ज्यांनी असे प्रकार केले असतील त्यांनी आताच ते कबूल करून बदली सवलतीचा हक्क सोडावा. हीच अखेरची संधी आहे. नंतर मात्र दोषींवर निलंबनासह थेट बडतर्फीचीही कारवाई होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन पाठपुरावा करील.

सीईओंच्या या भूमिकेमुळे आता बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत. पुढे होणाऱ्या आरोग्य, शिक्षण या मोठ्या विभागांतील बदल्यांमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTransferबदली