शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

शवविच्छेदनावरून नेवासा फाटा येथे वादंग : पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 17:01 IST

सकाळी आणलेल्या युवकाच्या मृतदेहाचे दुपारी चारपर्यंत शवविच्छेदन न करता वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नगरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेवासा फाटा : सकाळी आणलेल्या युवकाच्या मृतदेहाचे दुपारी चारपर्यंत शवविच्छेदन न करता वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नगरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नेवासा पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळल्याने मृतदेहाचे अखेर शवविच्छेदन करण्यात आले अन् तणाव निवळला.नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील नवनाथ मन्नू पल्हारे (वय २८) यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी उसाच्या शेतात आढळून आला होता. तीन दिवसापूर्वी त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली होती. नेवासा पोलीस ठाण्यात हा युवक बेपत्ता असल्याची नोंदही झालेली आहे.शवविच्छेदनासाठी युवकाचा मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. दुपारी चारपर्यंत शवविच्छेदन न करता वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नगरला हलविण्याचा सल्ला दिला, अशी मृताच्या नातेवाईकांची तक्रार आहे. संतप्त मृताचे नातेवाईक व वैद्यकीय अधिका-यांमध्ये चांगलीच वादावादी झाली. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेवासा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश जांभळे यांनी मृताच्या नातेवाईकांशी चर्चा करुन शांत केले. त्यानंतर मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. शंकरराव गडाख मित्र मंडळाचे कार्यकते, भाजपाचे युवा नेते अनिल ताके, शहराध्यक्ष पोपट जिरे, गोपीचंद पल्हारे,सुनील जाधव यांनी वैद्यकीय अधिका-यांशी शवविच्छेदनासंदर्भात चर्चा केली.

आम्ही मृतदेह सकाळी ११ वाजता रुग्णालयात आणला. त्यावेळी रुग्णालयातून शवविच्छेदन करु असे सांगण्यात आले. दुपारी तीन वाजता काही औषधेही आणण्यास सांगण्यात आले. दुपारी चार वाजता येथे शवविच्छेदन करता येणार नाही, मृतदेह नगरला हलवा, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.- नारायण पल्हारे, मयताचा मावस भाऊ

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा