शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘सेतू’मध्ये दाखल्यांची असुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 17:44 IST

दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते.

उमेश कुलकर्णीपाथर्डी : दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना जातीचे,नॉनक्रिमीलेअर, ओबीसी दाखले मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी दररोज सेतू केंद्रात हेलपाटे मारून आमचा दाखला झाला का? असे प्रश्न विचारत आहेत. दाखल्यांच्या या घोळामुळे विद्यार्थी गडबडून गेले आहेत.दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध दाखले गोळा करण्यात मोठा वेळ खर्च करावा लागत आहे. प्रांताधिकारी कार्यालयाकडून मिळणारे दाखले पंधरा दिवसांपासून न मिळाल्यामुळे विद्यार्थी चांगलेच वैतागले आहेत. एक जूनपासून सेतू केंद्राला ‘आॅन लाईन सबमिशन करा’ असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सेतू केंद्राने आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु आजतागायत हे दाखले विद्यार्थ्यांना न मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालक सेतू केंद्रात दररोज हेलपाटे मारताना दिसत आहेत. रहिवाशी, उत्पन्न, राष्ट्रीयत्व, शेतकरी, ३३ टक्के महिला आरक्षण असे दाखले तहसीलमधून मिळतात. परंतु गेल्या आठ दिवसांपासून तहसील कार्यालयात ‘थंब’ द्यायला अधिकारी नसल्यामुळे हे दाखले विद्यार्थ्यांना मिळाले नव्हते. परंतु बुधवारी तहसीलच्या अधिकाऱ्यांनी ‘थंब’ दिल्यानंतर गुरूवारपासून हे दाखले मिळायला सुरूवात झाली आहे. दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. विद्यार्थ्यांना विनासायास दाखले मिळण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने पालकांना पैशाची जमवाजमव करावी लागत आहे. त्यातच दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे पालक व विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रातून देण्यात येणाºया दाखल्यांसाठी सरकारने दर निश्चित केले आहे. मात्र काही ई-सेवा केंद्रे जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तहसीलदारांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्या पाथर्डी-नगर रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये सध्या फक्त दाखल्यांचीच चर्चा आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर