शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

‘महावितरण’विरुध्द असंतोष

By admin | Updated: July 25, 2014 00:26 IST

शेवगाव : तालुक्यातील रावतळे-कुरुडगाव येथील सिंगल फेज योजनेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी वीज कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले.

शेवगाव : तालुक्यातील रावतळे-कुरुडगाव येथील सिंगल फेज योजनेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी वीज वितरण कंपनीच्या येथील सहाय्यक अभियंता कार्यालयास टाळे ठोकले.तालुक्यातील रावतळे-कुरुडगाव येथील सिंगल फेज योजनेचे काम रखडले आहे. हे काम तातडीने मार्गी लागावे, या मागणीसाठी ग्रामस्थ व भाकपच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने वीज वितरण कंपनीच्या शेवगाव येथील कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा मागील आठवड्यात देण्यात आला होता. त्या अनुषंगाने कॉ.संजय नांगरे, किसान सभेचे बापूसाहेब राशीनकर,भाकपचे भगवान गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता सतीश शिंपी यांना चांगलेच धारेवर धरले. चर्चा करूनही मार्ग निघत नसल्याचे स्पष्ट झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर आणून कार्यालयास टाळे ठोकले. आंदोलनामुळे सहाय्यक अभियंता शिंपी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्नाची तीव्रता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी वीज वितरण कंपनीच्या नगर येथील अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार रावतळे-कुरुडगाव येथील सिंगल फेज योजनेचे काम आजच युद्धपातळीवर सुरू करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन शिंपी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात संजय लहासे, बाळासाहेब तुजारे, नवनाथ खंडागळे, रवींद्र निळ, सुभाष गरुड, उमाजी जवरे, अनिल निळ आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)छावण्यांसाठी रास्ता रोकोतिसगाव : पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करुन जनावरांच्या छावण्या सुरु कराव्या, खरीप हंगामाची नुकसान भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी आम आदमी पक्षाच्यावतीने गुरुवारी पाथर्डी तालुक्यातील त्रिभूवन फाट्यावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तिसगावच्या आठवडे बाजारामुळे महामार्गावर होत असलेली वाहनांची कोंडी पाहून पोलिसांनी आंदोलकांना बाजुला होण्याची जबरदस्ती केली. यावेळी आपचे ज्येष्ठ नेते सुधाकर आव्हाड,संघटक किसन आव्हाड यांनी पत्रकारांना पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी केलेल्या दमदाटीचा निषेध केला. याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सुधाकर आव्हाड यांनी सांगितले. प्रेसक्लबच्यावतीने सुभाष केकाण यांनी तहसीलदार सुभाष भाटे यांना निवेदन दिले. त्यानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आला. यावेळच्या चर्चेत किरण उपकारे,अंबादास कारखेले, मच्छिंद्र पालवे, हमीद बागवान, महेंद्र गर्जे, भाऊसाहेब पालवे यांनी सहभाग घेतला. नाभिक समाजाचा मोर्चा, ठिय्यापाथर्डी: पाथर्डी: नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, समाजाला सामाजिक न्याय मिळावा व इतर प्रमुख मागण्यांसाठी गुरूवारी नाभिक समाजाच्यावतीने पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन कार्यालय आवारात सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व समाजाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुखदेव मर्दाणे यांनी केले. नाभिक समाज व संत सेना महाराज सलून व व्यावसायिक संस्था यांच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चा गेटवरच अडविण्यात आला. त्यामुळे गेटवरच ठिय्या देण्यात आला. सुखदेव मर्दाणे म्हणाले, नाभिक समाज हातावर पोट भरणारा असल्याने या समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश झालाच पाहिजे. मागणी तात्काळ मान्य न केल्यास ११ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. रस्त्यासाठी नगर-दौंड मार्गावर रास्ता रोकोश्रीगोंदा : लोणीव्यंकनाथ रेल्वे गेट ते बेलवंडी स्टेशन रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी महाआघाडीच्यावतीने नगर-दौंड मार्गावरील लोणी रेल्वेगेट येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरूमांनी भरुन डांबरीकरणाचे बील काढण्याचे काम सध्या चालू आहे, असा आरोप सेनेचे नंदकुमार ताडे यांनी केला. या खराब रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही, असा इशारा भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुवर्णा पाचपुते यांनी केला. जितेंद्र पितळे, संतोष जठार, रावसाहेब रासकर, भाऊ डांगे यांचीही भाषणे झाली. आंदोलनात कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे नगर-दौंड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.