शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरच्या सभापतींवर उद्या अविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 13:11 IST

पारनेर बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रशांत गायकवाड यांच्याविरोधात राष्ट्रवादीचेच नेते सुजित झावरे यांच्या समर्थक संचालकांनी अविश्वास ठराव आणण्याची भूमिका घेतली आहे.

पारनेर : पारनेर बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रशांत गायकवाड यांच्याविरोधात राष्ट्रवादीचेच नेते सुजित झावरे यांच्या समर्थक संचालकांनी अविश्वास ठराव आणण्याची भूमिका घेतली आहे. या ठरावावर आमदार विजय औटी यांच्या समर्थक पाच संचालकांनी सह्या करून समर्थन दिले आहे. सोमवारी गायकवाड यांच्यावर पंधरा संचालकांच्या सह्यानिशी अविश्वास ठराव दाखल होणार आहे़सभापती गायकवाड हे मागील महिन्यात राष्ट्रवादी व काँग्रेसमधील एका गटाच्या सुपा येथील बैठकीला हजर होते़ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यामुळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या गटाने आठ संचालकांना बरोबर घेऊन गायकवाड यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली़ मात्र मला अजून काम करण्यास संधी हवी आहे, असे म्हणून गायकवाड यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता़ तर कार्यकर्त्यांना संधी म्हणून गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, असे झावरे यांचे म्हणणे होते़ दरम्यान मी या विषयावर योग्य वेळी बोलेन असे सभापती गायकवाड यांनी सांगितले.सेनेच्या संचालकांच्याही ठरावावर सह्याराष्ट्रवादीकडून गायकवाड यांच्याविरोधात आठ सह्या झाल्यानंतर आमदार विजय औटी यांच्याकडेही सेनेच्या संचालकांच्या सह्यांसाठी राष्ट्रवादीने आग्रह धरला़ आमदार औटी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीत सुरू असलेल्या नाराजीनाट्याचा शिवसेनेला होणारा राजकीय फायदा ओळखून सेनेच्या पाचही संचालकांना सह्या करण्यास संमती दिली. त्यानंतर सेनेच्या संचालकांनी शनिवारी अविश्वास ठरावावर सह्या केल्या. अविश्वास ठरावावर राष्ट्रवादीचे आठ, सेनेचे पाच, काँग्रेसचे दोन अशा १५ जणांच्या सह्या आहेत.गंगाराम बेलकर यांना संधी!राष्ट्रवादीकडून त्यांच्याच पक्षाचे गायकवाड यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते झावरे यांच्या गोटात असलेले माजी पंचायत समिती सभापती गंगाराम बेलकर यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर