शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

महिलेसह दोघांवर बिबट्याचा हल्ला

By admin | Updated: April 4, 2016 00:10 IST

संगमनेर : सकाळी पिंपळगाव देपाकडे देवदर्शनासाठी पायी निघालेल्या महिलेसह दोघा शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. मात्र, पळत सुटलेला हल्लेखोर बिबट्या विहिरीत पडला.

संगमनेर : सकाळी पिंपळगाव देपाकडे देवदर्शनासाठी पायी निघालेल्या महिलेसह दोघा शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. मात्र, पळत सुटलेला हल्लेखोर बिबट्या विहिरीत पडला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अलगदपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. या चित्तथरारक घटनेमुळे गांजवे वस्तीवरील ग्रामस्थ हादरून गेले आहेत. पठार भागातील पिंपळगाव देपानजीकच्या गांजवे वस्तीवर राहणाऱ्या मनीषा रेवजी गांजवे (वय ३८) या रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास देवदर्शनासाठी पायी पिंपळगाव देपा गावात जात होत्या. दरम्यान, शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने पंजे पाठीत मारल्याने मनीषा गांजवे जखमी झाल्या. हे दृश्य प्रत्यक्ष पाहणाऱ्या पोपट सुखदेव गांजवे (वय ४०) व सोपान किसन गांजवे (वय ३३) यांनी हल्लेखोर बिबट्यास हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चवताळलेल्या बिबट्याने पोपट गांजवे यांच्यावर चाल करून त्यांच्या पोटाला डाव्या बाजूने कडाडून चावा घेतला. बिबट्याचे दात पोटात घुसल्याने गांजवे गंभीर जखमी झाले, तर सोपान गांजवे हे बिबट्याच्या तावडीतून बालंबाल बचावले. गांजवे यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. मात्र, पळता-पळता तो शेतातील विहिरीत पडला. माहिती समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्यास क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. सदर बिबट्या हा अंदाजे तीन वर्षांचा असून तो मादी जातीचा आहे. बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी विहिरीभोवती मोठी गर्दी केली होती. या चित्तथरारक घटनेमुळे गांजवे वस्तीवरील ग्रामस्थ हादरून गेले आहेत. (प्रतिनिधी) बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मनीषा गांजवे व पोपट गांजवे यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिबट्याला वाचविण्यासाठी वन कर्मचारी आर. एस. चत्तर, वनरक्षक जी. एम. मुळे, बाळू फटांगरे, मुरलीधर वर्पे, अरगडे, सुभाष खरात, भाऊसाहेब कदम, दिलीप कुडेक, शरद मिंडे, वन मजूर किसन साबळे, रवी पडवळे यांच्यासह उत्तम वाळुंज, भाऊसाहेब खेमनर, डॉ. पांडुरंग गुंड, उपसरपंच नवनाथ कचरे यांनी विशेष परिश्रम घेतले. पकडलेल्या बिबट्यास वन विभागाच्या संगमनेर खुर्द येथील रोपवाटीकेत ठेवण्यात आले आहे.