शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

सीटीएसमुळे धनादेश वटण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 20:15 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने धनादेश वटण्याच्या पारंपरिक प्रक्रियेत नव्याने काही बदल केले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेसह इतर सहकारी बँकांचे धनादेश वटण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

ठळक मुद्देग्राहकांची पिळवणूक नोकरदार, विमाधारक, कामगार ग्राहकांना त्रास

अहमदनगर : भारतीय रिझर्व्ह बँकेने धनादेश वटण्याच्या पारंपरिक प्रक्रियेत नव्याने काही बदल केले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेसह इतर सहकारी बँकांचे धनादेश वटण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या बँकांचे धनादेश भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखा कार्यालयांमध्ये देखील स्वीकारले जात नाहीत. त्याचा त्रास नोकरदार, कामगार, विमा पॉलिसीधारक व सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

रिझर्व्ह बँकेने चेक ट्रंकेशन सिस्टीम (सी.टी.एस.) ही नवीन प्रणाली लागू केली आहे. रिझर्व्ह बँकेने अगोदरच याबाबत निर्देश देऊनही सहकारी व इतर काही बँकांनी याबाबतची पूर्वतयारी केली नव्हती. १ एप्रिलपासून सी. टी. एस. प्रणालीची राष्ट्रीयीकृत बँकांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. या प्रणालीनुसार ग्राहकाने दिलेला धनादेश (चेक) पूर्वीप्रमाणे टपालातून (मॅन्युअली) एका शाखेतून दुसऱ्या शाखेस पाठविण्याऐवजी ज्या बँकेत धनादेश भरला, त्याच बँकेतून तो स्कॅन होऊन ज्या शाखेच्या नावे धनादेश असेल, त्या शाखेत तो त्याचक्षणाला संगणकीय यंत्रणेमार्फत पाठवून त्याची काही क्षणातच पडताळणी केली जाते. पडताळणी होताच, हा धनादेश वटविला जातो. या पद्धतीनुसार धनादेश वटविण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे धनादेश तयार करण्यात आले आहेत. ग्राहकाचे नाव छापूनच त्याला धनादेश पुस्तिका दिल्या जात आहेत. हा धनादेश स्कॅन करून बँकेचा कोड व इतर तपशीलासह रिझर्व्ह बँक व संबंधित बँकेत संगणकीय यंत्रणेद्वारे तो पोहोचून त्याची वर्गवारी, पडताळणी झाल्यानंतरच तो ताबडतोब वटविला जात आहे. सीटीएस प्रणालीनुसार एमआयसीआर धनादेशाद्वारेच व्यवहार सुरू झाल्याने जुने धनादेश बाद झाले आहेत.अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अगोदरपासूनच कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब सुरू केलेला आहे. १५ दिवसांपासून बँकेत सीटीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. संगमनेर, कोपरगाव, राहुरीसह बºयाच ठिकाणी ही प्रणाली सुरू केली आहे. काही शाखांमध्ये लवकरच ती सुरू होणार आहे. सुरुवातच असल्याने काही प्रमाणात विस्कळीतपणा आला आहे. येत्या काही दिवसात या प्रणालीनुसार व्यवहार सुरळीत होतील. जिल्हा बँकेच्या २८६ शाखा आहेत. त्या सर्वांना नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या प्रणालीनुसार नवीन धनादेश छपाईची स्वतंत्रण यंत्रणा जिल्हा बँकेच्या मुख्यालयात सुरू करण्यात आली आहे.-रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सहकारी बँक, अहमदनगर.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbankबँक