शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

करंजी घाटात डिझेलचा टँकर उलटला; डिझेलचा रस्त्यावर पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 15:39 IST

मुंबईहुन परभणीकडे डिझेल घेवून जाणारा टँकर नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात अवघड वळणावर उलटला. यामुळे टँकरमधील डिझेलला गळती लागल्याने घाटात डिझेलचा पूर चालला होता. या अपघातात सुदैवाने चालक बचावला. घाटातील रस्ता डिझेलने ओला झाल्याने अनेक मोटारसायकलस्वार घसरून पडले.

करंजी : मुंबईहुन परभणीकडे डिझेल घेवून जाणारा टँकर नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात अवघड वळणावर उलटला. यामुळे टँकरमधील डिझेलला गळती लागल्याने घाटात डिझेलचा पूर चालला होता. या अपघातात सुदैवाने चालक बचावला. घाटातील रस्ता डिझेलने ओला झाल्याने अनेक मोटारसायकलस्वार घसरून पडले.रविवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मुंबईहुन परभणीकडे डिझेल घेवून टँकर (क्रमांक एम.एच.-४६, बी.बी.-५३२६) चालला होता. नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर हा डिझेलने भरलेला टँकर उलटला. यानंतर टँकरमधील डिझेलचा घाटात पूरच वाहत होता. संपूर्ण रस्ता डिझेलने ओला झाल्याने येणारे-जाणारे मोटारसायकलस्वार घसरून पडले. यात अनेक जण जखमी झाले आहेत. रिलायन्स जे.एफ.के. कंपनीचा हा टँकर होता. टँकरचालक बाळासाहेब गर्जे सुदैवाने अपघातातून बचावला आहे. डिझेलचा टँकर घाटात उलटल्याने समजताच गावातील व परिसरातील लोकांनी मोठमोठे ड्रम घेवून घाटाकडे धाव घेतली. काहींना भरपूर मिळाले तर काही रिकाम्या हाताने परतले.  अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून सुभाष अकोलकर, वसंत मुखेकर, विवेक मोरे, रमेश भाकरे, संदीप अकोलकर, संतोष खोसे, गणेश शिंदेसह अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांना मदत केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीAccidentअपघात