यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर नवले, मीनानाथ पांडे, बाळासाहेब नाईकवाडी, रमेश जगताप, अरीफ तांबोळी, शिवाजी नेहे, संपत कानवडे, मंदाबाई नवले, विक्रम नवले, रामदास धुमाळ आदी उपस्थित होते.
मधुकर नवले म्हणाले, मंत्री थोरात यांच्या बैठकीत जाणूनबुजून गोंधळ घातला गेला. त्याचे समर्थन डाव्या विचारसरणीच्या नेत्याने करावे, ही आश्चर्याची बाब आहे. तालुक्यात कोणी एकटा आंदोलन करीत नाही, याचा मागे जाऊन इतिहास तपासावा. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत आमदार महोदयांनी पालकमंत्री, आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाणे गरजेचे असताना शुल्लक आंदोलनात गुंतून ठेवून भोळ्या आमदारांचा फायदा कोण घेते याचा विचार खुद्द आमदारांनी करावा. रेमडेसिविर वितरण व्यवस्थित केले नाही म्हणून राज्याचे अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त यांना जबाबदार धरून त्यांना पदावरून हटविले आहे. मग मंत्री थोरात जबाबदार कसे? थोरात यांनी
अकोले -संगमनेर तालुक्यात कधीही दुजाभाव केला नाही. त्यांनी तालुक्यातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. हे अकोल्याच्या जनतेने विसरू नये. कोणतीही दुही निर्माण करणे दोन्ही तालुक्यांना परवडणारे नाही.
आंदोलन हे निर्मळ मनाने, समाजाभिमुख असावे. व्यक्तिद्वेष ठेवून आंदोलन करू नये. लहामटे यांना आमदार करण्यात मंत्री थोरात व काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे, हे विसरू नये. मीनानाथ पांडे, अरिफ तांबोळी यांनी पक्षाची बाजू मांडली.
............
रवी मालुंजकर हे बैठकीत जे काही बोलले हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्ष व माझ्याशी त्याचा काही संबंध नाही. त्यावरून कुणी राजकारण करू नये. मंत्री थोरात व महाविकास आघाडीतील सर्व पक्ष यांच्याविषयी मला नितांत आदर आहे.
- आमदार डाॅ. किरण लहामटे.