शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धांदरफळ बुद्रूक कोरोनाबाधीत हॉटस्पॉट क्षेत्र; १६२९ ग्रामस्थांची होणार दैनंदिन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 11:59 IST

संगमनेर : तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील ६८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण होवून गुरूवारी (७ मे) त्याचा मृत्यू झाला होता. ...

संगमनेर : तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील ६८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण होवून गुरूवारी (७ मे) त्याचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या या गावातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शहरातील कुरण रस्ता येथील एका महिलेस देखील कोरोनाची लागण झाली आहे. धांदरफळ बुद्रूक मधील १ हजार ६२९ ग्रामस्थांची दैनंदिन तपासणी सुरू  झाली आहे. संगमनेर तालुक्यात शुक्रवारी (८ मे) एकाच दिवशी कोरोना बाधित सात रूग्ण आढळून आल्याने १४ दिवस २२ मे पर्यंत काही भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित केला आहे.  धांदरफळ बु्रदूक ग्रामपंचायतीला प्रशासनाने सूचना दिल्यानंतर गावठाण क्षेत्र पूर्णपणे केले आहे. गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गावठाणात ३२३ घरे असून लोकसंख्या १ हजार ६२९ इतकी आहे. हा परिसर पूर्णपणे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला. अत्यावश्यक कारणांशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत. संगमनेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांमार्फत ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा ग्रामस्थांना करण्यात येतो आहे. तालुका आरोग्य विभागाच्यावतीने गावठाणातील प्रत्येक  व्यक्तीची दररोज आरोग्य तपासणी होणार आहे. कोरोनाची लागण होवून मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ३६ जणांना जिल्हा रूग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत प्राप्त अहवालात सहा जणांना कोरोनाची लागण झाली असून यात २८ वर्षीय महिला तर पाच वर्षीय बालकांचा देखील समावेश आहे. अद्यापही काही जणांचे अहवाल येण बाकी आहे.  तपासणीसाठी दहा पथके कार्यरत     १ हजार ६२९ ग्रामस्थांच्या दैनंदिन तपासणीसाठी दहा जणांचे पथक कार्यरत आहेत.  रोज १४ दिवस दररोज तपासणी केली जाणार आहे. वैद्यकिय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आशा, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक यांची पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. यातील कुणीलाही कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. नागरिकांनी तपासणीसाठी आरोग्य पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी केले आहे.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSangamnerसंगमनेर