शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धामोरी - बाभुळगाव शिवरस्ता झाला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST

राहुरी : रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून राहुरी तालुक्यातील धामोरी - बाभूळगाव या दोन्ही गावचा शिवरस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बंद ...

राहुरी : रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून राहुरी तालुक्यातील धामोरी - बाभूळगाव या दोन्ही गावचा शिवरस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बंद केला होता. यामुळे त्यापुढे जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची वाहने, ट्रॅक्टर व शेतीमाल काढण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. महसूलच्या सप्तपदी अभियानातून शेतकऱ्यांत समेट घडवून हा रस्ता खुला करण्यात आला आहे. यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.

धामोरी येथील शेतकऱ्यांनी शिवरस्ता खुला करुन मिळण्यासाठी महसूलच्या विजय सप्तपदी अभियानअंर्तगत रस्ता खुला करावा, यासाठी राहुरी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्या अर्जाचा श्रीरामपूर प्रांत कार्यालयाचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी डाॅ. दयानंद जगताप, राहुरीचे तहसीलदार फसेउद्दीन शेख यांनी तत्काळ दखल घेत पाहणी केली. शिव रस्त्यालगतच्या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्यात समन्वय साधत समेट घटविला. यानंतर जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने नंबरे रोवून व रस्त्यावरील पिके हटवून शिवरस्ता खुला केला. त्यामुळे पुढे जाणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण दूर झाली. रस्ता अतिक्रमण खुले करण्यासाठी वांबोरी महसूल मंडलाचे मंडलाधिकारी दत्ता गोसावी, तलाठी एस. यु. राणे, बाभूळगावच्या ग्रामसेवक श्रीमती ताकपिरे, सरपंच गोरक्षनाथ गिऱ्हे, उपसरपंच माने, धामोरीचे सरपंच काका बकरे, उपसरपंच रघुनाथ उगले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास गिऱ्हे, पोलीसपाटील उमेश पाटोळे, जाधव पाटील यांचे सहकार्य लाभले. महसूल विजय सप्तपदी अभियानांर्तगत शिवरस्ता खुला केल्याबद्दल प्रांताधिकारी डाॅ. जाधव व तहसीलदार शेख यांचे दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी आभार मानले.

.....

राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गावातील शिवरस्ते, पांदण रस्ते, महसुली नकाशावरील रस्ते, आक्रमण झालेले रस्ते असतील तर सर्वांनी एकत्र येऊन अभियानात भाग घ्यावा. सामंजस्याने रस्ते खुले करुन घ्यावेत. जेणेकरुन आपला शेतीमाल आपल्याला शेतीच्या बाहेर काढण्यास अडचण होणार नाही. या अभियानात शेतकरी एकत्र आल्यास रस्त्याचे प्रश्न मिटणार आहेत. त्याकरिता गावातील सरपंच, तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष, पोलीसपाटील, तलाठी आणि ग्रामसेवक यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

- डाॅ. दयानंद जाधव,

उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर.

.....