शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

विघ्नहर्त्याची भक्तिभावाने प्रतिष्ठापना

By admin | Updated: August 29, 2014 23:38 IST

जिल्ह्यात शुक्रवारी ठिकठिकाणी विघ्नहर्ता श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी रात्री उशिरापर्यंत ‘श्री’ची प्रतिष्ठापना केली.

अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून - ‘गणपती बाप्पांचा जयघोष’, ढोल, ताशांचा गजर, गुलालाची मुक्त उधळण, अशा मंगलमय वातावरणात जिल्ह्यात शुक्रवारी ठिकठिकाणी विघ्नहर्ता श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी रात्री उशिरापर्यंत ‘श्री’ची प्रतिष्ठापना केली.‘एक गाव एक गणपती’पारनेर : तालुक्यात सुमारे ७० गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवून ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनप्रसंगी काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावली तरी दुष्काळाचे सावट गणेशोत्सवावर असल्याचे दिसून आले.पारनेरसह निघोज, टाकळीढोकेश्वर, सुपा, जवळे, वाडेगव्हाण, वडझिरे, अळकुटी, गोरेगाव, राळेगणसिध्दी येथे उत्साहात गणेशाची स्थापना करण्यात आली. पारनेर शहरात जय भवानी मित्र मंडळ, संभाजीनगर मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, जीप-चालक मित्र मंडळ, गणपती गल्ली मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, सागरदास मित्र मंडळ, संत गोरोबा कुंभार मित्र मंडळ, पिंपळेश्वर मित्र मंडळ, पराशर मित्र मंडळ,विघ्नहर्ता मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, क्रांती चौक मित्र मंडळ, पद्मावती मित्र मंडळ, काशी विश्वेश्वर मित्र मंडळ, नो चँलेज मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, पाटाडी मळा, नवयुग मित्र मंडळ व नागेश्वर मित्र मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी पारनेरच्या मुख्यपेठेतून मिरवणूक काढून अनेक गणेश मंडळे प्रतिष्ठापना करीत होते. मात्र यावर्षी एक ते दोन मंडळे वगळता इतरांनी मिरवणूक न काढणेच पसंत केले.श्रीगोंद्यात मूर्ती खरेदीसाठी गर्दीश्रीगोंदा : श्रीगोंदा शहरासह तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. वरुणराजाने जलवर्षाव केल्याने गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. श्रीगोंदा येथील कुंभारवाड्यात गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती. पन्नास रुपयापासून ते २१ हजारापर्यंत गणेश मूर्र्तींच्या किंमती होत्या. जयमल्हारच्या वेषातील गणरायाच्या मूर्र्तींना मागणी होती.