शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 15:55 IST

जगविख्यात असलेली श्री साईबाबांची शिर्डी म्हणजेच साईनगरी सर्वत्र ध्वनी व वायू प्रदुषणाने ग्रासली गेल्याने साईभक्तांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

रियाज सय्यदशिर्डी : जगविख्यात असलेली श्री साईबाबांची शिर्डी म्हणजेच साईनगरी सर्वत्र ध्वनी व वायू प्रदुषणाने ग्रासली गेल्याने साईभक्तांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.सध्या साईनगरीचे तापमान साधारणत: ३१ ते ३३ अंश सेल्सिअस इतके आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. वातावरणातील आर्द्रता मानवी आरोग्यास घातक आहे. शिर्डीसारख्या आंतरराष्टÑीय दर्जाच्या धार्मिक स्थळी साई समाधी दर्शनासाठी देश-विदेशातील साईभक्त मोठ्या संख्येने येतात. विमान, रेल्वे, एस.टी. बसेस व खासगी वाहनांच्या सहाय्याने साईभक्तांना प्रवास करावा लागतो. शिर्डी शहर व परिसरात निवासी व वाणिज्य वापराची जागा असून औद्योगीकरण झालेले नाही. शहरात दररोज किमान ६० हजार भाविकांची रेलचेल असते. विजयादशमी, गुरूपौर्णिमा व रामनवमी या तिन्ही उत्सवाच्या काळात भाविकांचा आकडा काही लाखांवर जातो.शहरात लक्ष्मीनगर नाला, सुलभ शौचालये, कचरा संकलन केंद्र यामुळे देखील प्रदूषण जाणवते. साईभक्तांच्या गर्दीने जीव गुदमरतो. असंख्य वाहनांमधून निघणाऱ्या धुराने परिसर अच्छादून जातो. त्याचे आरोग्यावर हानीकारक परिणाम होतात. नैसर्गिक व अनैसर्गिक प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी हृदयाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे साईभक्तांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.स्वच्छ भारत अभियानात शिर्डी शहराने देशात नावलौकीक प्राप्त केला आहे. नगरपंचायतीतर्फे दैनंदिन कचरा वर्गीकरण करून संकलीत केला जातो. मात्र स्वच्छतेविषयी देश-विदेशातून येणाºया भाविकांमध्ये अधिक प्रचार-प्रसार करण्याची गरज आहे.लक्ष्मीनगर नाला नगरपंचायतीच्या अखत्यारीत आहे. ५० टक्के उघड्या नाल्यालगत झोपडपट्टी असल्याने सांडपाण्याचे प्रदूषण होते. तर उर्वरित ५० टक्के नाला बंदिस्त आहे. शहरात भुयारी गटार योजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत कुठल्याही प्रकारे प्रदूषित होत नाहीत. ओल्या कचºयापासून खत निर्मिती केली जाते. त्यामुळे प्रदूषण होत नाही. सभा व उत्सवांमुळे सतत ध्वनी प्रदूषण असते. या काळात ८५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असल्याने नियमांचे पालन होत नाही. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहतुकीच्या दृष्टीने ध्वनी व वायू प्रदूषणाचे मोजमाप होणे गरजेचे आहे. - सतीश दिघे, मुख्याधिकारी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी