शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तोंडी चर्चेचा तपशील माहिती अधिकारात देता येणार नाही; नगरच्या धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाचे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 20:32 IST

मोहटा देवस्थानच्या चौकशीला स्थगिती देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी झालेली चर्चा ही तोंडी स्वरूपात आहे. या चर्चेची प्रत उपलब्ध नाही. त्यामुळे माहिती अधिकारात याबाबत तपशील देता येणार नाही, असे उत्तर धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने दिले आहे. तोंडी चर्चेची प्रत उपलब्ध नाही, तर धर्मादाय उपआयुक्तांचा आदेश वैध मानायचा कसा? असा प्रश्न याप्रकरणी निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमोहटा देवस्थानच्या चौकशीला स्थगिती देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी झालेली चर्चा ही तोंडी स्वरूपात आहे.या चर्चेची प्रत उपलब्ध नाही. त्यामुळे माहिती अधिकारात याबाबत तपशील देता येणार नाही, असे उत्तर धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने दिले आहे. तोंडी चर्चेची प्रत उपलब्ध नाही, तर धर्मादाय उपआयुक्तांचा आदेश वैध मानायचा कसा? असा प्रश्न याप्रकरणी निर्माण झाला आहे.

अहमदनगर : मोहटा देवस्थानच्या चौकशीला स्थगिती देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी झालेली चर्चा ही तोंडी स्वरूपात आहे. या चर्चेची प्रत उपलब्ध नाही. त्यामुळे माहिती अधिकारात याबाबत तपशील देता येणार नाही, असे उत्तर धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने दिले आहे. तोंडी चर्चेची प्रत उपलब्ध नाही, तर धर्मादाय उपआयुक्तांचा आदेश वैध मानायचा कसा? असा प्रश्न याप्रकरणी निर्माण झाला आहे.‘लोकमत’ची वृत्तमाला तसेच, विविध तक्रारींवरून मोहटा येथील जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या कारभाराची चौकशी येथील धर्मादाय उपआयुक्त कार्यालय यांच्यामार्फत सुरू आहे. शासनाने या चौकशीबाबत आदेश दिलेला आहे. या चौकशीसाठी गत १२ जुलैला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील निरीक्षकांचे पथक मोहटा देवस्थानच्या कार्यालयात जाणार होते. मात्र, याच दिवशी धर्मादाय उपआयुक्तांनी या दौ-याला स्थगिती देणारा आदेश काढला. ११ जुलैला रात्री दहा वाजता वरिष्ठ कार्यालयासोबत चर्चा झाली असून, त्या चर्चेनुसार हा दौरा स्थगित करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.कोणत्या वरिष्ठ कार्यालयाशी व अधिका-याशी चर्चा झाली, याचा तपशील मात्र या आदेशात नाही. त्यामुळे ‘लोकमत’ने माहिती अधिकारात याबाबत विचारणा केली केली. त्यावर ही चर्चा तोंडी असल्याने तिचा तपशील उपलब्ध नाही, असे सांगत न्यास नोंदणी कार्यालयाने माहिती दिलेली नाही. माहिती अधिकारात माहिती ही केवळ कागदपत्रांच्या प्रतींच्या स्वरूपात देणे अभिप्रेत आहे, असेही या कार्यालयाने म्हटले आहे.तोंडी चर्चा झाली असेल, तर त्यावरून चौकशीला स्थगिती देता येते का? कोणत्या नियमानुसार तोंडी चर्चा ग्राह्य धरली जाते? असाही प्रश्न माहिती अधिकारात विचारण्यात आला होता. मात्र, याही प्रश्नाचे उत्तर या कार्यालयाने दिलेले नाही. त्यामुळे धर्मादाय उपआयुक्त यांनी काढलेला आदेश नियमानुसार आहे का? असा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या या आदेशाबाबत चौकशीची मागणी यापूर्वीच झाली आहे.

जुलैपासून चौकशी लालफितीत

धर्मादाय उपआयुक्त यांनी काढलेल्या स्थगिती आदेशामुळे गत जुलैपासून ही चौकशी ठप्प आहे. शासनाने आदेश देऊनही चौकशी झालेली नाही. त्यामुळे यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धर्मादाय आयुक्तांनी प्रकरणांचा जलद निपटारा करण्याचे धोरण घेतले आहे. मोहटा देवस्थानची चौकशी मात्र, धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाकडून पूर्णत्वास जाताना दिसत नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर