अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या कामाचा लेखाजोखा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी टीम तयार करा. येत्या आठ दिवसांत बूथ रचना करून बैठका घेण्याच्या सूचना भाजपचे राज्याचे विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे यांनी दिल्या.
भाजपच्या डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीला आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास बेरड, अशोक खेडकर, तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, रेवणनाथ चोभे, हरिभाऊ कर्डिले, बबनराव आव्हाड, बाबा काळे, बाबासाहेब खर्से, रभाजी सूळ, दीपक कार्ले, श्रीकांत जगदाळे, उद्धव कांबळे, बाबासाहेब जाधव, संतोष कुलट, प्रंशात गहिले, शुभम भांबरे, रामदास सोनवणे, दीपक लांडगे, रमेश पिंपळे, अंजना येवले यावेळी उपस्थित होते. अनासपुरे पुढे म्हणाले, की प्रत्येक वयोगटाचे वर्गीकरण करा. या अभियानात जास्तीत जास्त तरुणांना सभासद करून घ्या. आठ दिवसांत बूथ रचना तयार करा, बूथ प्रमुखाच्या बैठका घ्या, बूथ मजबूत करा, अशा सूचना यावेळी दिल्या.
...
दहा गावांत बूथ रचना करणाऱ्यांनाच उमेदवारी
जिल्ह्यातील बूथ रचनेबाबत बोलाताना माजी आमदार कर्डिले म्हणाले, दहा गावांत बूथ रचनेचे काम सक्षमपणे करणाऱ्यांना उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाईल. प्रत्यक्षात गावात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्यांनाच जिल्हा परिषद, पंचायत समिती, सोसायटींच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे.
....
सूचना: फोटो १४ भाजप नावाने आहे.