शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत पुतळ्याची विटंबना, नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको; तालुका बंदची हाक

By सुदाम देशमुख | Updated: March 26, 2025 22:08 IST

माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात

राहुरी (जि. अहिल्यानगर) : शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे समाेर आले. या घटनेमुळे शहरातील नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरात तणावाचे वातावरण असून माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.गुरुवारी तालुका बंदची हाक देण्यात आली. राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवासिंद बाबा तालमीत बजरंग बली यांची मूर्ती आहे. शेजारीच महापुरुषांचा पुतळा होता. बुधवारी दुपारी दोन वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने तालमीत जाऊन पुतळ्याची विटंबना केली. काही वेळाने तरुणांच्या हा प्रकार निदर्शनास आला. काही वेळातच शेकडो युवकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा निषेध केला. जमाव आक्रमक झाला.

घटनेची माहिती मिळताच, प्रातांधिकारी किरण सावंत, तहसीलदार नामदेव पाटील, यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार अशोक शिंदे, सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, सतीश कुऱ्हाडे, राहुल यादव, नदीम शेख आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.संतप्त शेकडो युवकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपींचा शोध घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर युवक नगर-मनमाड महामार्गावर मल्हारवाडी चाैकात आले. तिथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, चाचा तनपुरे, माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, हर्ष तनपुरे, माजी नगरसेवक नंदू तनपुरे यांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जवळपास तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे शहरातील दुकाने पटपट बंद करण्यात आली. या घटनेबाबत राहुरी नगरपालिकेचे लिपिक हरिश्चंद्र बिवल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माेठा बंदाेबस्त तैनात

शहरात तणावपूर्ण शांतता आहे, तसेच दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

आधी तालुका नंतर जिल्हा बंदची हाकया घटनेमुळे गुरुवारी (दि. २७) राहुरी शहर व तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आठवडे बाजारही भरणार नाही. दाेन दिवसांत आराेपी न सापडल्यास जिल्हा बंदचा इशारा देण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल

घटनेनंतर आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करण्याचा आदेश दिला असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.