शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरांचे सोफे पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 10:42 IST

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनातील फर्निचरचे १५ लाख रुपयांचे बिल पाठपुरावा करूनही न मिळाल्याने एका ठेकेदाराने मंगळवारी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या दालनातील सोफे पळविले.

ठळक मुद्देमहापालिका : बिले न मिळाल्याने ठेकेदारांचे कृत्य, गुन्हा दाखल करण्याचा आदेश

अहमदनगर : महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनातील फर्निचरचे १५ लाख रुपयांचे बिल पाठपुरावा करूनही न मिळाल्याने एका ठेकेदाराने मंगळवारी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या दालनातील सोफे पळविले. अन्य पदाधिकाºयांच्या दालनातील सोफेही घेऊन जाण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.महापालिकेत महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समितीचे सभापती, महिला व बालकल्याण समितीचे सभापती असे पाच पदाधिकारी आहेत. त्यांच्या दालनात, अ‍ॅन्टी चेंबरमध्ये आणि स्वीय सहायकांच्या दालनात सोफे, खुर्च्या देण्यात आल्या आहेत. संबंधित दालनातील पदाधिकारी पुरवठादाराला थेट आॅर्डर देऊन फर्निचर, सोफे मागवून घेतात. नंतर त्यांचे बिल लेखा विभागाकडे पाठविले जाते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही बिल न मिळाल्याने एका ठेकेदाराने चक्क उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या दालनातील सोफे, खुर्च्या पळवून नेल्या. ठेकेदारांनी दालनातील सोफे बाहेर आणून ठेवले. स्थायी समितीच्या सभापतीच्या दालनातील सोफाही पळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र सभापतींनी त्यास अटकाव केला. या प्रकाराने महापालिकेत एकच खळबळ उडाली. तब्बल तासभर महापालिकेत गोंधळ सुरू होता. अन्य पदाधिकाºयांच्या दालनातील सोफेही घेऊन जाण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे. महापालिकेत इरफान शेख व पार्टी यांनी सोफे पुरविले आहेत. त्यांचे पैसे थकल्याने त्यांनी सोफे ताब्यात घेतले. प्रशासनाच्या एकाही अधिकाºयाने या प्रकाराला अटकाव केला नाही. दरम्यान शहर अभियंता, शाखा अभियंता यांनी मात्र कानावर हात ठेवणेच पसंत केले. दरम्यान प्रशासनाधिकाºयांनी ही बाब जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या कानावर घातली. त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. मात्र सायंकाळपर्यंत कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नव्हती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका