भिंगार : अहमदनगरमधून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या आरोपीला पोलिसांनी गुरुवारी (दि.३) नगर शहरातील त्रिमूर्ती चौक, सारसनगर येथे अटक केली. बिरजा ऊर्फ बिरजू राजू जाधव (वय २५, रा. मकासरे चाळ, कोठी, स्टेशन रस्ता, नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, हेड कॉन्स्टेबल राजू सुद्रिक आदींनी ही कारवाई केली.
हद्दपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By | Updated: December 5, 2020 04:39 IST