अहमदनगर : कोतवाली पोलीस ठाण्यातील दोन लाचखोर पोलिासांना जिल्हा न्यायाधीश (क्रमांक ३) श्रीमती रिझवी यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनीच न्यायालयाकडे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र तपास अधिकारीच न्यायालयात हजर नसल्यामुळे सरकारी वकिलांची पंचाईत झाली. दोन दिवसांनी पोलिसांनी त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार सोन्याबापू मांडगे आणि पोलीस कॉन्स्टेबल चांगदेव आंधळे यांना माळीवाडा भागात पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती. माळीवाडा भागातील व्यावसायिक सिराज शेख यांनी नाशिक विभागाच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी सापळा लावून दोघांना रंगेहाथ पकडले होते. या दोघांना कोतवाली पोलिसांनीच न्यायालयासमोर हजर केले. त्यांची उपकारागृहात रवानगी करण्यात आली. (प्रतिनिधी)
पोलिसांची उपकारागृहात रवानगी
By admin | Updated: July 24, 2023 17:00 IST