शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या आजाराने विद्यार्थिनीचा मृत्यू

By admin | Updated: August 24, 2016 00:46 IST

शिर्डी : शिर्डीत साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे़ डेंग्यूमुळे दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला़ शगुफ्ता अहमदभाई कुरेशी असे या विद्यार्थिनीचे नाव असून

शिर्डी : शिर्डीत साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे़ डेंग्यूमुळे दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला़ शगुफ्ता अहमदभाई कुरेशी असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या अकाली मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.दहावीच्या वर्गात शिकत असलेली शगुफ्ता हिस ताप येत असल्याने तिला संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी नेले होते़ मात्र बेड शिल्लक नसल्याने सलाईन घेऊन तिला पुन्हा घरी पाठविण्यात आले़ कॉट रिकामी झाल्यावर अ‍ॅडमीट करुन घेतले, मात्र सोमवारी रात्रीच्या वेळी अचानक ताप वाढल्याने तिला अतिदक्षता विभागात दाखल केल़े तेथे उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालवली.शिर्डीत गेल्या महिन्याभरापासून साथींच्या आजाराने थैमान घातले आहे. गोचीड ताप, थंडी-ताप, मलेरिया, पांढऱ्या पेशी कमी होण्याचे प्रमाण आदी आजारामुळे प्रत्येक घराघरात रुग्ण दिसत आहे. शिर्डीतील साईनाथ रुग्णालय, साईबाबा रुग्णालय, खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मोठी गर्दी दिसते. रक्त, लघवी तपासणीसाठी सर्वच लॅबवर रांगा लागल्या आहेत़ साई संस्थानच्या रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. या गर्दीमुळे शगुफ्ताला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत़ ही मुलगी गरीब कुटुंबातील असून शाळेत अत्यंत गुणी होती़ निधनाची वार्ता समजताच शाळेतील विद्यार्थिनींनी अक्षरश: आक्रोश केला़ येथील कब्रस्थानमध्ये तिचा दफन विधी करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक रमेश गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ गोंदकर यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)