सावेडीचा झपाट्याने विकास झाला असून, नवीन शहर म्हणून हे उपनगर पुढे येत आहे. सावेडीचा पश्चिम भाग बोल्हेगावला जोडणारा आहे. या परिसरात रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधा आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात जागा असून, त्या जागेत कचरा साचलेला आहे. या भागात घरबांधणीस चालना दिल्यास उपनगर म्हणून विकास साधला जाणार आहे. या भागात बाजारपेठ उभी राहून व्यापाराला चालना मिळणार आहे. तर अनेकांना रोजगारदेखील मिळणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पावसाळ्यात या भागात संघटनेच्या वतीने रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण केले जाणार आहे. तसेच भाजी मार्केटचीदेखील मागणी करण्यात येणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हटले आहे. यासाठी अॅड. गवळी, ओम कदम, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, कॉ. बाबा आरगडे आदी प्रयत्नशील आहेत.
सावेडीच्या विकासाला चालना देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST