शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन सर्वसामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी हेरंब कुलकर्णी विशेष प्रयत्न करीत आहेत. आजच्या शिक्षकांपुढे ते एक आयडॉल असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. शिक्षण क्षेत्रात स्वत:ला झोकून ते कार्य करीत आहेत. पगाराची आवश्यक तेवढीच रक्कम घेऊन त्यांचे विद्यादानाचे पवित्र कार्य सुरू आहे. तसेच शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक उत्तम कलाकृती साकारल्या आहेत. देशासह परदेशादेखील त्यांच्या कलेला तोड नाही. अनेक कलाकारदेखील त्यांनी घडविले आहेत. त्यांच्या शिक्षण व कला क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी व शिफारस पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी अॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अशोक सब्बन, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा आदी प्रयत्नशील आहेत.
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, शिल्पकार कांबळे यांना पद्मश्री देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST