शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राम शिंदे यांचा पराभव ही मोठी चूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:22 IST

कर्जत : गेल्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा झालेला पराभव ही कर्जत, जामखेडकरांची चूकच झाली. आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपच ...

कर्जत : गेल्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा झालेला पराभव ही कर्जत, जामखेडकरांची चूकच झाली. आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपच विजयी होईल, असा आत्मविश्वास अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे नूतन संचालक आंबादास पिसाळ यांनी व्यक्त केला.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल माजीमंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांच्या वतीने सोमवारी चोंडी येथे अंबादास पिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिसाळ पुढे म्हणाले, बँकेची निवडणूक भाजप प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. निवडणुकीत विजय खेचून आणला. विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. कर्जत, जामखेडच्या जनतेने राम शिंदे यांचा गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव करून चूक केली आहे. आता माझ्या विजयाने पुन्हा भाजपच्या विजयाची परंपरा सुरू झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे, माजी सरपंच दादासाहेब सोनमाळी, सरपंच काकासाहेब धांडे, नगरसेवक संदीप बरबडे, विजय भोसले, राजेंद्र तोरडमल, रवींद्र पिसाळ, संभाजी चव्हाण व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

.....