शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीतूनच झाली व्यापारी हिरण यांची हत्या : पाच आरोपींना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 16:10 IST

बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण आणि हत्याकांड खंडणीतून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण आणि हत्याकांड खंडणीतून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी आज येथील शासकीय विश्रामगृह येथे तपासाची माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे, उपअधीक्षक संदिप मिटके, नगर येथील गुन्हे शाखेचे अनिल कटके, निरीक्षक संजय सानप यावेळी उपस्थित होते.

या प्रकरणी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर  येथून पाच आरोपींना अटक केली आहे. संदिप मुरलीधर हांडे (वय २६, माळेगाव, ता.सिन्नर), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय २५, रा.सप्तशृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर), अजय राजू चव्हाण (वय २६, पास्तेगाव, मारुती मंदिरासमोर, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (वय २९, रा.उक्कडगाव, ता.कोपरगाव) व एक २२ वर्षीय आरोपी या आरोपींना अटक करण्यात आली. अपहरण करण्यासाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.

 

आरोपींकडून हिरण यांचा मोबाईल फोन तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हँन (एमएच १५, जीएल ४३८७) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सागर गंगावणे व बिट्टू वायकर या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. गुन्ह्यातील काही आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासात आणखी काही आरोपी निष्पन्न होतील. हिरण यांच्याकडे अपहरण झाले त्यावेळी एक लाख ६५ हजार रुपयांची रक्कम होती. हिरण यांची हत्या मारुती व्हँनमध्येच करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गालगत आणून टाकण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली.

 

असा झाला गुन्ह्याचा उलगडा

अपहरण घडले त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी मारुती व्हँनमधून संशयास्पदरित्या एका व्यक्तीला नेताना पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी अनेक व्हँनचा शोध घेतला. त्यावरून नाशिक येथील व्हँन मिळून आली. ती मूळ मालकाकडून एकाने चालविण्यास घेतली होती. त्यामुळे संशय बळावल्यानंतर काही तासांमध्ये सर्व आरोपींना पकडले. या गाडीत हिरण यांच्या मोबाईलसह बँकेचे चेकबूक व पावत्या सापडल्या. त्याचबरोबर आरोपींपैकी एकाने मोठी चूक केल्याने पोलिसांना फायदा मिळाला. मात्र त्याविषयी अधिक माहिती देण्यात आली नाही.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरahmednagar policeअहमदनगर पोलीस