शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

पहिलीच्या पटसंख्येत तीन हजारांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 11:26 IST

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटीचे सत्र सुरूच असून,चालूवर्षी पहिल्याच्या वर्गातील पटसंख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक यंदाही अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटीचे सत्र सुरूच असून,चालूवर्षी पहिल्याच्या वर्गातील पटसंख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक यंदाही अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे.जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी शिक्षण समितीकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क जिल्हा परिषदेने भरले. याशिवाय अनेक उपक्रम वर्षभरात राबविण्यात आले. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या स्थिर राहिल, अशी अपेक्षा शिक्षण समितीला होती. मात्र शिक्षण विभागाच्या अहवालानुसार पहिलीच्या वर्गातील पटसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत घटली आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्याच्या वर्गात ३ हजार ३४१ एवढे कमी प्रवेश झाले़ गेल्या २०१०पासून पटसंख्या घटीचे सत्र सुरू आहे. ते अद्याप पाट सोडायला तयार नाही़ फरक एवढाच की पूर्वीची घट ही ५ ते १० हजारांच्या घरात असे़. ती आता ३ ते ४ हजारांवर आली आहे. याचाच अर्थ पटसंख्या स्थिर ठेवण्यात जिल्हा परिषदेला अद्याप यश आलेले नाही.जिल्हा परिषद शिक्षकांनी गावोगावच्या शाळेत दाखल पात्र असलेल्या मुलांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण शाळा सुरू होण्याआधीच केले होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सहा वर्षांहून अधिक वय असलेली ४१ हजार ३३९ मुले होती़ प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर यापेक्षा अधिक मुलांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे. तसा अहवाल शिक्षण विभागाने समितीला सादर केला आहे. सर्वेक्षण करताना सहा वर्षे वय असणाऱ्या मुलांचेच सर्वेक्षण करण्यात आले, पण, शाळा सुरू झाल्यानंतर ५ वर्षे आणि ८ महिने पूर्ण असलेल्या मुलांना प्रवेश देण्याचा आदेश आला. त्यामुळे ही पटसंख्या वाढली असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणने आहे.अशी घटली पटसंख्याअकोले-९२, संगमनेर-७८, कोपरगाव-९३, श्रीरामपूर-२५, राहाता-३०, राहुरी-४०, नेवासा-६४९, शेवगाव-३२, पाथर्डी-३५, जामखेड-६८, कर्जत-४६, श्रीगोंदा-५७, पारनेर-५०, नगर-५८सर्वेक्षणावर प्रश्नचिन्हशाळा सुरू होण्याआधी शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात दाखलपात्र मुलांची संख्या ४१ हजार ३३९ आहे. यंदा पहिलीच्या वर्गात घेतलेल्या मुलांची संख्या ४४ हजार ३३४ एवढी आहे.  चालूवर्षी एकही मुलगा खासगी शाळेत गेला नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असून, सर्वेक्षणावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद