शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे बंद असलेली कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:27 IST

अहमदनगर : लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात पुन्हा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला असून, आधार प्रमाणिकरण करण्यास जिल्ह्यातील बँकांनी सुुरुवात केली आहे़.

अहमदनगर : लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात पुन्हा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला असून, आधार प्रमाणिकरण करण्यास जिल्ह्यातील बँकांनी सुुरुवात केली आहे़.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले़ त्यामुळे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी थांबविण्यात आली होती़ गेल्या तीन महिन्यांपासून कर्जमाफी योजना थांबविल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला होता़ परंतु, सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्याचा आदेश जारी केला़ सरकारने  यापूर्वीच लॉकडाऊनच्या काळात उर्वरित पात्र २८ हजार शेतकºयांची यादी पोर्टलवर प्रसिध्द केली होती़.

या शेतकºयांना सरकारकडून येणे दर्शवून नव्याने पीक कर्ज देण्याचाही आदेश जारी केला होता़ परंतु, बँकांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली़ त्यामुळे सरकारने आधार प्रमाणिकरणास हिरवा कंदील दाखविला असून, तशा सूचना बँकांना करण्यात आल्या आहेत़ जिल्हा सहकारी बँकेने शाखांमध्येच आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध केली असून, दोन दिवसांत १० हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले आहे़ इतर व्यापारी बँकांनीही आधार प्रमाणिकरण करून शेतकºयांना तातडीने नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत़.---

कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करून त्यांना नवीन कर्ज वाटप करण्यात येत आहेत़ तशा सूचना बँकांना करण्यात आल्या आहेत़    -संदीप वालवलकर, अग्रणी जिल्हा प्रबंधक

---नियमित कर्जफेड करणाºयांना प्रोत्साहन नाहीचसरकारने नियमित कर्जफेड करणाºयांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे़. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करून दुुसºया टप्प्यात नियमित कर्जफेड करणाºयांना ही रक्कम दिली जाणार होती़ परंतु, कोरोनामुळे सरकारचा महसूल बुडाला़ त्यामुळे सरकारकडून याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्याने नियमित कर्जफेड करणाºयांना सरकारकडून मिळणाºया मदतीबाबत साशंकता आहे़