केडगाव : विळद घाट (ता. नगर) परिसरातील केकताई भागात धबधब्याखाली पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या १४ ते १५ युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१८) दुपारी घडली.
मयूर नरेश परदेशी (वय २१, रा. मोची गल्ली, तोफखाना, नगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. नगर शहरातील तोफखाना भागात असलेल्या मोची गल्लीतील १४ ते १५ युवक रविवारी विळद घाट येथील केकताई परिसरात धबधब्यावर फिरण्यास गेले होते. धबधब्याखाली असलेल्या पाण्यात युवक पोहत होते. परंतु, त्यांच्यापैकी तीन युवक पोहताना बुडण्याच्या बेतात होते. त्यांना मयूर परदेशी याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले. दोघांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले, परंतु तिसऱ्या युवकाला पाण्याबाहेर आणताना मयूरचा दम तुटला आणि तो स्वतः पाण्यात बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मयूरला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय उपचारापूर्वीच मयूरचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहाचे सोमवारी (दि.१९) सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी नालेगाव अमरधाम येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
190721\img-20210719-wa0212.jpg
तरूणाचा मृत्यू