शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

स्वाईन फ्ल्यूने महिलेचा मृत्यू

By admin | Updated: October 10, 2023 17:42 IST

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील दहिगाव-शे येथील लता कचरू दुबे (वय ४२) या महिलेचा स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराची लागण होवून मृत्यू झाला़

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील दहिगाव-शे येथील लता कचरू दुबे (वय ४२) या महिलेचा स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराची लागण होवून मृत्यू झाला़ दुबे यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़ मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी (दि़९) त्यांचा मृत्यू झाला़ स्वाईन फ्ल्यूने महिलेचा मृत्यू झाल्याने दहिगाव-शे परिसरात घबराट पसरली आहे़ आरोग्य विभाग मात्र, अद्यापही झोपेतच आहे़ दहिगाव-शे येथील लता दुबे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यावर त्यांना प्रथम चापडगाव व नंतर शेवगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र, आजाराचे निदान न झाल्याने त्यांची प्रकृती खालावली़ त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णाालयात दाखल करण्यात आले़ दुबे यांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले़ त्यामध्ये दुबे यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले़ उपचार सुरू असतानाच त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला़ महिलेच्या मृत्यूनंतर दहिगाव-शे येथील माजी सरपंच रमेश भापकर यांनी औरंगाबाद रुग्णालयातील अहवाल पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला सादर केला़ मात्र, गावातील उपाययोजनांबाबत आरोग्य विभागाने काहीच दखल घेतली नाही़ त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)दहिगाव-शे येथील लता दुबे यांच्या मृत्युचा अहवाल कार्यालयास प्राप्त झाला आहे़ दहिगाव-शे परिसरात स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराची लागण होवू नये, यासाठी तातडीने दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ -डॉ़ चंद्रकांत परदेशी, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी