शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवरासंगमजवळ रिक्षाला लागलेल्या आगीत भाजलेल्या औरंगाबादच्या तिसऱ्या मुलाचाही मृत्यू, दोघांचा जागेवरच झाला होता मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:08 IST

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगमजवळ सोमवारी मध्यरात्री अ‍ॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत दोन चिमुरड्यांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला. तर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान जुनेदचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

नेवासा : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगमजवळ सोमवारी मध्यरात्री अ‍ॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत दोन चिमुरड्यांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला. तर गंभीर भाजलेल्या तिसऱ्या मुलाचाही उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.नेवासा पोलीस ठाण्यात शफिक रफिक कुरेशी (रा. संजयनगर नं-५ औरंगाबाद) यांनी खबर दिली आहे. नेवासा तालुक्यातील चांदा येथील कुरेशी यांच्या नातेवाईकांचा सोमवारी संध्याकाळी साखरपुडा होता. त्यासाठी कुरेशी कुटुंबिय औरंगाबादहून चांदा येथे आले होते. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर रिक्षा (क्र. एम.एच.२०-ईएस ०७२२) मध्ये चालक समीर हनिफ कुरेशी, रफिक हाजिजाफर कुरेशी (वय ५५), जुनेद शाफिक कुरेशी (वय १३), नमिरा शाफिक कुरेशी (वय ८), महेविश आतिक कुरेशी (वय ७) (सर्व रा़ संजयनगर नं-५ औरंगाबाद) हे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादला जाण्यासाठी निघाले होते. प्रवरसंगम जवळील पेट्रोल पंपासमोर त्यांची रिक्षा आली असताना रिक्षाने पेट घेतला. त्यामध्ये नमिरा शाफिक कुरेशी (वय ८), महेविश आतिक कुरेशी (वय ७) या दोन चिमुरड्यांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला. तर जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. यातील जुनेद शाफिक कुरेशी (वय १३) याची प्रकृती गंभीर होती. त्याचाही औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

नातींचा मृत्यू पाहिला डोळ्यांनी

या घटनेत एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती रिक्षामधून प्रवास करीत होते. खबर देणारे शफिक रफिक कुरेशी यांचे वडिल रफिक कुरेशी, मुलगी नमिरा, मुलगा जनेद आणि पुतणी महेविश हे सर्व रिक्षामधून जात होते. तर रिक्षाचालकही त्यांचा नातेवाईक होता. रिक्षाने पेट घेतल्यानंतर आजोबांनी जखमी अवस्थेत जुनेदला वाचविले. मात्र, पेटलेल्या रिक्षात नमिरा व महेविश या दोघी नातींचा होरपळून झालेला मृत्यू पाहण्याखेरीज त्यांच्याकडेही पर्याय उरला नाही. रिक्षाने पेट घेतल्यानंतर ही रिक्षा परिसरातील नागरिकांनी व प्रवाशांनी पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान नागरिकांनी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून जखमी तिघांना रुग्णालयात हलविले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाAccidentअपघात