शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मुळा नदीपात्रात धुणे धुण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 16:40 IST

राहुरी : मुळा नदीपात्रात आईबरोबर धुणे धुण्यासाठी गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. राहुरी रेल्वे ...

राहुरी : मुळा नदीपात्रात आईबरोबर धुणे धुण्यासाठी गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली असून भारती ज्ञानेश्वर हिवराळ असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.भारती (वय १४) ही प्रसाद विद्यालयाची विद्यार्थिनी असून शाळेला सुट्टी असल्यामुळे ती आईबरोबर नदीवर गेली होती. धुणे धुत असताना भारतीचा पाय घसरल्याने ती नदीपात्रात पडली़ तिला पोहता येत नसल्यामुळे ती पाण्यात बुडू लागली. तिच्या आईने आरडाओरड केली. त्यानंतर आजुबाजुचे नागरीक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी भारतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे भारतीला पाण्याबाहेर काढण्यात नागरिकांना अपयश आले.घटनेची माहिती मिळताच राहुरी नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. राहुरी स्टेशन येथील राजु निकम यांनी भारतीचा शोध घेतला़ एका वाळूच्या खड्ड्यातून भारतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांंगितले. राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरriverनदी