शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थुंकी अंगावर उडाल्याने दारुच्या नशेत मारहाण, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 11:00 IST

दुचाकीवरुन जात असताना थुंकी अंगावर उडाल्याने दारुच्या नशेतील तिघांनी दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

अहमदनगर : दुचाकीवरुन जात असताना थुंकी अंगावर उडाल्याने दारुच्या नशेतील तिघांनी दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आयुर्वेदिक चौकात घडली. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे. महेश बाळाप्पा बारसे( वय-३५, माळीवाडा) असे मारहाणीत मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. रवी उत्तम साठे, आनंद एकनाथ सकट, रोहित श्रावण केदारी यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी विशाल हिरामण बारसे याने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मयत महेश बारसे हा दुचाकीवरून आयुर्वेद चौकातून जात होता. याचवेळी येथे असणा-या तिघांचा अंगावर थुंकी गेली. त्यामुळे दारुची नशेतील आरोपी रवी उत्तम साठे, आनंद एकनाथ सकट, रोहित श्रावण केदारी यांनी महेश यास बेदम मारहाण केली. ही घटना पुतण्या विशाल हिरामण बारसे यास समजली. त्यानंतर त्याने सिव्हील हॉस्पिटलमध्ये महेश यास उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान महेशचा मृत्यू झाला. कोतवाली पोलीस ठाण्याचे मुकुंद दुधाळ यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शाहिद शेख, रवींद्र घुंगासे, भारत इंगळे यांनी आरोपींचा शोध घेत तासाभरात तीनही आरोपींना अटक केली. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस